esakal | नाशिक काय घेऊन बसलात, इथं 66 रुग्णांचा जीव धाेक्यात आला हाेता

बोलून बातमी शोधा

oxygen cylender 1.jpg
नाशिक काय घेऊन बसलात, इथं 66 रुग्णांचा जीव धाेक्यात आला हाेता
sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड : शहरातील सहापैकी तीन कोविड रुग्णालयांतील ऑक्‍सिजनचा साठा संपल्याने तेथील 66 अत्यवस्थ कोविड रुग्णांचा जीव बुधवारी टांगणीला लागला होता. कारण रात्रभर पुरेल एवढाच साठा शिल्लक राहिला होता. परिणामी, डॉक्‍टांच्या चिंतेतही भर पडली होती. मात्र, डॉक्‍टरांनी तातडीने हालचाल करून साताऱ्याहून 30 आणि कोल्हापूरहून 20 अशी 50 सिलिंडरची उपलब्धता केल्यामुळे सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला.

संबंधित रुग्णालयांना मदतीसाठी पालिका, आरोग्य विभाग व सामाजिक संस्था, व्यक्ती धावून आल्या. त्यांच्या माध्यमातून तिन्ही रुग्णालयांना दुपारनंतर ऑक्‍सिजन सिलिंडरसह तब्बल 30 पोर्टेबल मशिन पुरविण्यात आले. सध्या ऑक्‍सिजन सप्लाय करणाऱ्यांनी 20 ऑक्‍सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे कऱ्हाड शहर अध्यक्ष डॉ. वैभव चव्हाण यांना सांगितले. पोर्टेबल मशिन उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. ऑक्‍सिजनच्या तुटवड्याने यंत्रणा हतबल आहे. जनरल वॉर्डातील कोविड रुग्णांना पोर्टेबल मशिनचा ऑक्‍सिजन चालतो. त्यामुळे सामाजिक संस्थासह कार्यकर्त्यांनी जमा केलेल्या व पालिकेच्या 30 पोर्टेबल ऑक्‍सिजन मशिन तिन्ही कोविड रुग्णालयात पोच केल्या आहेत. अजून काही मशिनची गरज आहे.

शहरात संस्था, व्यक्तींनी पोर्टेबल ऑक्‍सिजन एकत्रित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरात साेमवारी रात्री 100 सिलिंडरचा साठा मिळाला होता. मात्र, तो पुरेसा नसल्याने मंगळवारी कऱ्हाड हॉस्पिटल, राजश्री व एरम हॉस्पिटमधील ऑक्‍सिजन संपला. मंगळवारची रात्र पुरेल एवढाच साठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे मोठी कठीण स्थिती झाली आहे. अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची संख्या 66 आहे. त्यामुळे धावाधाव करून डॉ. वैभव चव्हाण, मुख्याधिकारी रमाकांत डाके व सामाजिक काम करणाऱ्या युवकांनी ऑक्‍सिजनची उपलब्धता केली.

अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीला पाचशे वर्षांत प्रथमच सोन्याचा मुकुट घालण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहरासह तालुक्‍यातील हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजन कमी पडणार नाही, याची व्यवस्था प्रशासन करत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले आहे. याबराेबरच नागरिकांनी पालिकेच्या पोर्टेबल ऑक्‍सिजन मशिन नेल्या होत्या. त्या चार महिन्यांपासून विनाकारण स्वतः जवळ ठेवल्या आहेत. त्यांनी तत्काळ त्या पालिकेत जमा कराव्यात. विनाकारण मशिन स्वतःजवळ ठेवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिला आहे.

तांबवेतील नंदकिशोरचा राजधानीत झेंडा; दिल्लीत पहिल्याच प्रयत्नात 'यश'

शेतकऱ्यांची देणी थकविल्याने किसन वीर, खंडाळा कारखान्याला जप्तीची नोटीस

फक्त नाशिकच नव्हे; देशातील यापुर्वीच्या वायू गळतीच्या मोठ्या घटना, वाचा सविस्तर