esakal | 'आहे त्या मनुष्यबळावर सेवा द्या'; आता मनसेच्या भुमिकेवर लक्ष

बोलून बातमी शोधा

Maharashtra NavNirman Sena
'आहे त्या मनुष्यबळावर सेवा द्या'; आता मनसेच्या भुमिकेवर लक्ष
sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : येथील ग्रामीण रुग्णालयात अपुऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे कोरोनाबाधित मृत महिलेचा मृतदेह वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच शववाहिकेत ठेवावा लागत असल्याचे वृत्त सकाळ माध्यम समूहाने विविध फ्लॅटफार्मवर प्रसिद्ध केल्यानंतर आज तहसीलदार किरण जमदाडे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन तेथील अडचणी जाणून घेत रुग्णालय व्यवस्थापनाला सूचना केल्या.

येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले असून, याठिकाणी रुग्णांसाठी 30 ऑक्‍सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, शहरात बाधितांची वाढ होत असून, उपलब्ध असणारे 30 बेडही कमी पडू लागले आहेत. त्यातच ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्याची कमतरता जाणवत आहे. सोमवारी (ता. 19) एका बाधित महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी (ता. 20) दुपारी त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रुग्णालयात अपुऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे बाधित महिलेचा मृतदेह दुपारपर्यंत शवविच्छेदनगृहात होता. अखेरीस एका वैद्यकीय अधिकाऱ्यालाच एका कर्मचाऱ्याला मदतीला घेऊन पुरेशी दक्षता घेत तो मृतदेह शववाहिकेत ठेवावा लागला.

हेही वाचा: उपचारापासून मृतदेह उचलन्यापर्यंत सर्व वैद्यकीय अधिकारीच करतात

याबाबत सकाळ माध्यम समूहाने विविध फ्लॅटफार्मवर वृत्त प्रसिद्ध करून रुग्णालयातील अपुऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत स्थिती मांडली होती. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या पदाधिका-यांनी कर्मचारी भरती न केल्यास आंदाेलनाचा इशाराही दिला आहे. दरमन्यान तहसीलदार जमदाडे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. त्याठिकाणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. सम्राट भादुले यांच्याशी चर्चा केली. रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या व कमतरता जाणवणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत माहिती घेतली. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता असली, तरी उपलब्ध मनुष्यबळावर रुग्णांना योग्य ती सेवा द्यावी. कोरोनाबाधित रुग्णांना मिळणाऱ्या सेवा, सुविधांची माहिती घेतली, तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूसही तहसीलदार जमदाडे यांनी आस्थेवाईकपणे केली.

अकलूजच्या मोहिते-पाटलांचा नीरा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे भूत पुन्हा जनतेच्या मानगुटीवर बसविण्याचा प्रयत्न

यल्या थांब, पळू नको'; महिला पोलिसाच्या मोबाईलवरच चोरट्याचा डल्ला