esakal | 'यल्या थांब, पळू नको'; महिला पोलिसाच्या मोबाईलवरच चोरट्याचा डल्ला

बोलून बातमी शोधा

Police
'यल्या थांब, पळू नको'; महिला पोलिसाच्या मोबाईलवरच चोरट्याचा डल्ला
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरी निघालेल्या महिला पोलिसाच्या हातातील मोबाइल व कॅलसी हिसकावून चोरट्याने पळ काढला. पोलिसांनी चोरट्याला ओळखून त्याच्या नावाने हाक मारल्याने चोरट्याने साहित्य टाकून पळ काढला.

याबाबत महिला पोलिस नाईक सरोजनी अजय शिंदे (रा. शाहूपुरी) यांनी यल्या अनिल कोळी (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. ही घटना काल रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. तक्रारदार महिला पोलिस ठाण्यातील कामकाज संपवून घरी निघाल्या होत्या. त्या शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या इमारतीजवळ आल्या असताना यल्या कोळीने त्यांच्या हातातील मोबाईल व कॅलसी हिसकावून पळ काढला.

Corona Helpline म्हणजे 'भरवशाच्या म्हशीला टोणगा'; बेडसाठी करावी लागतीय वणवण

दरम्यान त्याचवेळी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस हवालदार हसन तडवी हे निघाले होते. त्यांनी पळ काढणाऱ्या संशयिताला यल्या थांब, पळू नको, असा आवाज दिला. पोलिसांनी ओळखल्याच्या भीतीने संशयिताने मोबाइल व कॅलसी तेथेच टाकून आकाशवाणी झोपडपट्टीच्या दिशेने पळ काढला. तडवी यांनी संशयिताचा पाठलग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन त्याने पळ काढला.

Edited By : Balkrishna Madhale