esakal | 'वैभवशाली इतिहासाची साक्ष असणाऱ्या मालुसरेंच्या जन्मभूमीचा कायापालट करणार'

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News, Satara News}

गोडवली हे गाव नरवीर तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी असल्याने गावाला वेगळा इतिहास असल्याचे मत आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केले.

'वैभवशाली इतिहासाची साक्ष असणाऱ्या मालुसरेंच्या जन्मभूमीचा कायापालट करणार'
sakal_logo
By
रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : गोडवली हे गाव नरवीर तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी असल्याने गावाला वेगळा इतिहास आहे. गावाच्या वैभवाला साजेशी अशी ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत उभी राहिली आहे. हे गाव आपण दत्तक घेतलेले असून, आदर्श गोडवली गाव साकारण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आमदार मकरंद पाटील यांनी दिली. 

गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन, रस्त्याचे भूमिपूजन व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळ्याप्रसंगी आमदार पाटील बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, माजी सभापती रूपाली राजपुरे, पंचायत समितीच्या सभापती अंजना कदम, तालुका आरोग्य अधिकारी अजित कदम, प्रवीण भिलारे, जावली बॅंकेचे संचालक सुभाष कदम, माजी कृषी सभापती राजेंद्र भिलारे, गटविकास अधिकारी नारायणराव घोलप, पाचगणीचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार, विस्तार अधिकारी सुनील पार्टे, ग्रामसेविका सपना जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 

शरद पवारांच्या आदेशानेच सातारा-जावळीत हस्तक्षेप; शशिकांत शिंदेंचे शिवेंद्रसिंहराजेंना चोख प्रत्युत्तर

बाळासाहेब भिलारे म्हणाले, "राजेंद्र राजपुरे हे आता तालुक्‍याचे नेते आहेत. त्यांना लहान समजू नका. तालुक्‍याची धुरा त्यांच्याकडेच आहे.'' आम्ही आता रिटायर झालो असून, यापुढे ज्येष्ठांचे काम करणार आहोत, असेही श्री. भिलारे उपरोधकपणे बोलले.'' राजेंद्र राजपुरे म्हणाले, ""गोडवली-दांडेघर रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासठी दोन कोटी 63 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.'' नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य मंगेश पवार, विष्णू मालुसरे, स्नेहल पवार, संगीता मालुसरे, शोभा मालुसरे, नीलम मालुसरे, अजय कांबळे यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंचपदासाठी मंगेश पवार यांचे नाव निश्‍चित करण्यात आले. प्रारंभी निवृत्त सुभेदार मेजर अंकुश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. माजी सरपंच सुरेश मालुसरे, संदीप मालुसरे, नितीन मालुसरे, सचिन मालुसरे, योगेश मालुसरे, तुकाराम मालुसरे, हणमंत मालुसरे यांच्या हस्ते प्रमुख उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. 

कॉंग्रेसच्या चुकीच्या कृषी कायद्यांमुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जानकरांचा गंभीर आरोप

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे