Maratha Reservation : कऱ्हाडात येणार उद्या मराठ्यांचे वादळ; मोर्चाची जय्यत तयारी

दहा वाजता येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन
marataha kranti morcha
marataha kranti morchasakal

कऱ्हाड - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला ५० टक्यांच्या आत आरक्षण मिळावे यासाठी येथे उद्या (सोमवारी) कऱ्हाड तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी शहरासह गावोगावी जनजागृती करुन मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरासह गावा-गावातील आबालवृध्द मराठे हजारोच्या संख्येने येथे दाखल होणार आहेत. उद्या सकाळी दहा वाजता येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चाला प्रारंभ होईल. त्यानंतर तहसीलदार कार्यालयासमोर प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात येईल. तेथे मोर्चाचा समारोप होईल.

अशी आहे मोर्चाची आचारसंहिता

* मोर्चा होईपर्यंत स्वयंस्फुर्तीने अन्न, पाणीत्याग करावे.

* कोणत्याही समाजाविरोधात घोषणा देण्यात येवु नयेत.

* व्यसन न करता मोर्चात सहभागी व्हावे.

* मोर्चात कोणीही हुल्लडबाजी, धक्काबुकी करु नये.

* मोर्चात ठरलेल्या घोषणाच देण्यात याव्या.

* स्वयंशिस्त पाळुन स्वयंसेवक, पोलिसांनी सहकार्य करावे.

* चर्चे ते हेडपोस्टादरम्यान कोणत्याही घोषणा देवु नये.

असा असेल मोर्चाचा मार्ग

येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन उद्या (सोमवारी) सकाळी दहा वाजता मोर्चास प्रारंभ होईल. तेथुन तो आझाद चौक मार्गे चावडी चौक, तेथुन कन्याशाळेसमोरुन जोतीबा मंदिरापासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येईल. तेथुन महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा मुख्य पोस्ट कार्यालयासमोरुन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळयास अभिवादन करुन दत्त चौकातुन तहसीलदार कार्यालयासमोर नेण्यात येईल.

marataha kranti morcha
Maratha Kranti Morcha : आरक्षणासाठी मराठा समाजाचे एकदिवसीय लाक्षणिक साखळी उपोषण

पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी दोन पोलिस निरीक्षक यांच्यासह 18 अधिकारी, १०० पोलिस कर्मचारी, दोन सुरक्षा दलाच्या तुकड्या, वाहतुक शाखेचे ३४ कर्मचारी, साध्या वेशातील पोलिसांची नऊ पथके तैनात करण्यात आली आहेत. आवश्यकता भासल्यास जादा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

marataha kranti morcha
Maratha Kranti Morcha : पिंपरी-चिंचवड शहर दुकाने, हॉटेल ‘बंद’; बाजारपेठेत शुकशुकाट

येथे आहे पार्किंगची व्यवस्था

- तांबवे, सुपने, उंब्रज, वहागांव, तळबीड, चरेगावातील वाहनांना दैत्य निवारणी मंदिर परिसर

- विंग, कोळे, चचेगांव, येरवळेतील वाहनांना पंकज हॉटेलमागे

- काले, उंडाळे, ओंड, आटके, रेठरे, वाठारच्या वाहनांना ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील उद्यान परिसर

- वडगांव, शेरे, शेणोली, कार्वे परिसरातील वाहनांना बाजार समिती, भेदा चौकात परिसर

- करवडी, ओगलेवाडी, मसूर, कोपर्डे, अंतवडी, शामगाव, किवळ, शिरवडेतील वाहनांना शिवाजी हायस्कूल, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com