प्रलंबित कृषी पंपांना लवकरच वीज कनेक्‍शन; महाविकास आघाडीचा महत्वपूर्ण निर्णय

हेमंत पवार
Monday, 21 December 2020

भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या माथी मारलेली प्रतिकनेक्‍शन स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर योजना रद्द करून पारंपरिक पद्धतीने व मागणीनुसार सौरऊर्जेद्वारे नवीन वीज कनेक्‍शन जोडणी करण्याची वस्तुस्थिती ऊर्जामंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना क्रमवारीनुसार प्रलंबित वीज कनेक्‍शन जोडणी देण्याचा आदेश नुकताच निर्गमित केला असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

कऱ्हाड (जि. सातारा) : शेतकऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेऊन मी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे कृषिपंप ग्राहकांची प्रलंबित वीज कनेक्‍शन तातडीने जोडणी करावी, प्रतिकनेक्‍शन स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर योजना रद्द करून पारंपरिक पद्धतीने वीज कनेक्‍शन द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने क्रमवारीनुसार प्रलंबित वीज कनेक्‍शन जोडणी करण्याचा आदेश निर्गमित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नुकतीच दिली. 

मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील जिरायत जमिनी बागायत करण्यासाठी शेतकऱ्यांनी बोअर मारल्या आहेत. विहिरींची खुदाई केल्या आहेत. विहीर व नदीपासून आपापल्या शेतापर्यंत पाइपलाइनची कामे करून मोटर पंप व स्टार्टर पॅनेल बोर्ड बॅंकांची कर्जे काढून खरेदी केलेली आहेत. महावितरणकडे नवीन वीज कनेक्‍शनसाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून वीज कनेक्‍शनची मागणी करून महावितरणच्या नियमानुसार डिपॉझिट रक्कम महावितरणकडे जमा केली आहे. गेली चार ते पाच वर्षांपूर्वीपासून वीज कनेक्‍शन प्रलंबित आहेत. बॅंकांच्या कर्जाचे व्याज चालू आहे. बॅंका कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहेत. याबाबत अनेक शेतकऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेऊन मी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे कृषिपंप ग्राहकांची प्रलंबित वीज कनेक्‍शन तातडीने जोडणी करण्यात यावीत, यासाठी प्रत्यक्ष भेटून आणि पत्रव्यवहार करून मागणी केलेली होती. 

UK ची विमान सेवा तात्काळ थांबवा : पृथ्वीराज चव्हाण

त्याचबरोबर भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या माथी मारलेली प्रतिकनेक्‍शन स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर योजना रद्द करून पारंपरिक पद्धतीने व मागणीनुसार सौरऊर्जेद्वारे नवीन वीज कनेक्‍शन जोडणी करण्याची वस्तुस्थिती ऊर्जामंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना क्रमवारीनुसार प्रलंबित वीज कनेक्‍शन जोडणी देण्याचा आदेश नुकताच निर्गमित केला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो कृषिपंप ग्राहकांना वीज कनेक्‍शन मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Minister Balasaheb Patil Promise To Provide Electricity Connection To Agricultural Pumps