
ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासंदर्भात पोलिसांनी माहिती गोळा केलेली आहे. ती सर्व माहिती आमच्या जवळ आहे. त्या माहितीचा कशा पध्दतीने उपयोग करता येईल याचा वरिष्ठ पातळीवर विचार करु, असे स्पष्ट संकेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासंदर्भात कोणतीही तक्रार माझ्याकडे आली नाही, ना पोलिस खात्याकडे, ना गृह खात्याकडे, नाही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाली. त्यामुळे जो पर्यंत कोणाची तक्रार येत नाही, तो पर्यंत त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार नसल्याचे स्पष्ट मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
साताऱ्यात गृह विभागाची माहिती देण्यासाठी आज तालुका पोलिस स्टेशन शेजारील शिवतेज हॉलमध्ये गृह राज्यमंत्री देसाई यांची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासंदर्भात छेडले असता, त्यांनी कोणाचीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केल्याने एकप्रकारे उदयनराजेंची पाठराखण केल्याची चर्चा पुन्हा साताऱ्यात रंगली आहे.
तशी वेळ आली, तर मेडिकल कॉलेजचं पण उद्घाटन करणार; उदयनराजेंचा प्रशासनाला इशारा
ते पुढे बोलताना म्हणाले, ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनाचा गुन्हा आहे की, याचा आम्हाला तपास करावा लागेल. ज्या कोणाची तक्रार असेल, तर ती तक्रार काय स्वरुपाची आहे, याचीही माहिती आम्हाला शोधावी लागील. उदयनराजेंनी उद्घाटनावेळी गर्दी जमवली, कोरोनाचे नियम तोडले ही तक्रार असेल, तर त्याला वेगळे नियम आहेत. शासकीय प्रकल्पाचं उद्घाटन केलं असेल, तर त्यालाही वेगळे नियम आहेत. त्यामुळे तक्रारचं द्यायला कोणी पुढे येत नसेल, तर मग कारवाई कशी होणार?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Gram Panchayat Results : राष्ट्रवादी-भाजप आघाडीने सेनेला केले चारीमुंड्या चित!
ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासंदर्भात पोलिसांनी माहिती गोळा केलेली आहे. ती सर्व माहिती आमच्या जवळ आहे. त्या माहितीचा कशा पध्दतीने उपयोग करता येईल याचा वरिष्ठ पातळीवर विचार करु, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. तसेच त्यांनी छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्गाचा बोर्ड फाडल्यावर भाष्य करताना म्हणाले, तो बोर्ड जाणीवपूर्वक कोणीही फाडलेला नाही, त्या भुयारी मार्गा नजीकच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यामुळे असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे स्वत: उद्घाटन करुन भुयारी मार्ग खुला केला होता, तसेच कालही उदयनराजे यांनी शासकीय ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासंदर्भात जिल्हा प्रशासनावर ताशेरे ओढले होते, त्यामुळे ग्रेड सेपरेटरचा वाद निर्माण झाला आहे.