esakal | राज ठाकरेंचा आदेश येताच साताऱ्यात औरंगाबाद एसटीचे 'संभाजीनगर' नामकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सातारा बसस्थानकावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा-औरंगाबाद बसला संभाजीनगर फलक लावून आंदोलन केले.

राज ठाकरेंचा आदेश येताच साताऱ्यात औरंगाबाद एसटीचे 'संभाजीनगर' नामकरण

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : येथील मुख्य बसस्थानकात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सातारा एसटी डेपोतून औरंगाबादकडे जाणाऱ्या प्रत्येक एसटी बसवर छत्रपती संभाजीनगर हा फलक लावूनच रवाना करावी, अशी आग्रही भूमिका घेत आंदोलन केले. त्यांनी एसटी बसचा फलक बदलून तो सातारा-संभाजीनगर केला. तसेच यापुढे औरंगाबादला जाणाऱ्या सर्व बसचा फलक संभाजीनगर करावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तो फलक बदलून एसटी बसेस रवाना करेल, असा आक्रमक पवित्रा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सातारा बसस्थानकावर मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सातारा-औरंगाबाद बसला संभाजीनगर फलक लावण्यात यावा, यासाठी आंदोलन केले. मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, विकास पवार, जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे, सातारा शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. राहुल पवार म्हणाले, गेल्या 32 वर्षांपासून शिवसेनेने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आम्ही करू. या एकाच मुद्द्यावर संभाजीनगरच्या जनतेसोबत कायम भावनिक राजकारण करून जनतेचा विश्वासघात करत सत्ता मिळवली. आज शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून देखील छत्रपती संभाजीनगर हे नामकरण करू शकलेले नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. मनसेने हा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतला असून साताऱ्यात मुख्य बसस्थानकात मनसेच्या कार्यकर्त्यांनी सातारा एसटी डेपोतून औरंगाबादकडे जाणाऱ्या प्रत्येक एसटी बसवर छत्रपती संभाजीनगर हा फलक लावूनच रवाना करावी, अन्यथा मनसेचे कार्यकर्ते तो फलक लावून एसटी बसेस रवाना करेल, असा आक्रमक पवित्रा श्री. पवार यांनी घेतला. 

महावितरणसमोर भाजपचा एल्गार; सातारा, वाई, कऱ्हाडात महाविकासला झटका

राजेंद्र केंजळे म्हणाले, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण व्हावे, हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. गेली अनेक वर्षे मनपामध्ये सेनेची सत्ता असून आज मुख्यमंत्री सेनेचा असून नामांतराचे विधेयक पारित केलेले असून देखील या नामांतरणाला वेळ लागत आहे. यासाठी आज मनसेने 'आरपार'ची लढाई रस्त्यावर उतरून लढायला सुरुवात केली आहे. मनसेच छत्रपती संभाजीनगर असे नामांतरण करणार आहे.

मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात भडका; इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीची पेटली चूल

यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सोनाली शिंदे, राजेंद्र (आप्पा) बावळेकर, सागर बर्गे, अविनाश दुर्गावळे, संजय गायकवाड, समीर गोळे, शिवाजी कासुरडे, निखिल कुलकर्णी, प्रतिक माने, विनय गुजर, रोहित शिंगरे, श्‍याम बावळेकर, दिनेश धनावडे, राणीताई शिंगरे, सोनाली कांबळे, शुभम विधाते, अमर महामुलकर, सुयोग जाधव, सुजीत पवार, संजय शिर्के, संजय सोनावणे,मयुर नळ, भरत रावळ, वैभव वेळापुरे, दिलीप सोडमिसे, अझहर शेख, गणेश पवार, चैतन्य जोशी आदी सहभागी झाले होते. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image