माढ्यातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावू; पंतप्रधान मोदींचे खासदार रणजितसिंहांना आश्वासन

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

फलटण शहर (जि. सातारा) : नीरा-देवघर पाणी प्रश्न, फलटण-पंढरपूर लोहमार्ग, जिहे- कटापूर योजना, कृष्णा- भीमा स्थिरीकरणसह माढा लोकसभा मतदारसंघात रोजगारासाठी मोठा प्रकल्प यावा यासह रखडलेले प्रश्न व प्रकल्प सकारात्मक भूमिकेतून मार्गी लागतील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. 

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्नी व जिल्हा परिषद सदस्या ऍड. जिजामाला नाईक- निंबाळकर यांच्यासमवेत पंतप्रधानांची पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. त्या वेळी त्यांनी मतदारसंघातील रखडलेले प्रश्न व प्रकल्पांबाबतची माहिती पंतप्रधानांना दिली. नीरा- देवघर धरणाचे काम पूर्णत्वास गेले असले, तरी कालव्याची कामे प्रलंबित आहेत. या कामासाठी 1 हजार कोटींच्या निधीची गरज आहे. हे काम पूर्ण झाल्यास फलटणसह खंडाळा, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व पूर्वी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले आहे. सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी जाणीवपूर्वक सोडविला नाही. नीरा- देवघरच्या कालव्यांची कामेही जाणीवपूर्वक रखडवून हे पाणी बारामतीकडे वळविल्याचेही त्यांनी मोदी यांच्या निदर्शनास आणून दिले. 

मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही, तर रक्तपात होईल; उदयनराजेंचा सरकारला कडक इशारा

प्रकल्पासाठी केंद्रातून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. माण- खटावमधील गुरुवर्य (कै.) लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे- कटापूर) केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत राबविली जात आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 1061.34 कोटी खर्च अपेक्षित आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून 100 टक्के निधी मिळावा, अशीही मागणी रणजितसिंह यांनी केली. फलटण-पंढरपूर लोहमार्गाच्या कामासाठी केंद्राकडून निधी देण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर व ऍड. जिजामाला नाईक- निंबाळकर यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांची प्रतिमा भेट दिली. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Political Buzz Intensifies Over Sangli-Satara MLC Seat as NCP Weighs Candidates
From Farm Waste to Fuel: Gadkari Backs Bioenergy Revolution for Farmers
Only Rainwater Harvesting Homes to Be Registered in Innovative Village Initiative
MD Drug Seizure in Karad: Three Accused Nabbed, Luxury Assets Confiscated
Marathi News Esakal
www.esakal.com