Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सैन्यभरतीची वयोमर्यादा त्वरित वाढवा; खासदार पाटलांची संरक्षणमंत्र्यांकडे मागणी

Published on

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाने उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे सातारा जिल्ह्यासह अन्य ठिकाणची सैनिकभरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे त्यांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. अशा इच्छुकांची संधी हिरावू नये, यासाठी भारत सरकारने "खास बाब' म्हणून यावर्षी सैनिकभरतीची वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंग यांच्यासह रक्षाप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याकडे केली.
 
खासदार पाटील लोकसभा अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहेत. त्यावेळी त्यांनी संबंधितांना प्रत्यक्ष भेटून ही मागणी केली. कोरोना संसर्गामुळे गत वर्षापासून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम सैनिकभरती प्रक्रियेवर झाला आहे. वर्षभरापासून भरती झालेली नाही. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी भरतीप्रक्रिया कोल्हापूर येथे घेण्यात येते. सैन्यदलात जाण्याचे स्वप्न बाळगणारे तरुण मेहनत घेतात. 

मात्र, सैन्यभरती प्रक्रिया वारंवार स्थगित होत असल्याने त्यांची संधी हुकत आहे. कोल्हापूर येथे होणारी भरती पुन्हा काही काळ स्थगित होण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने हजारो तरुणांची संधी हुकण्याची शक्‍यता आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने भरती आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही भरतीप्रक्रिया आणखीन पुढे लांबण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सध्या इच्छुक असलेल्या तरुणांची वयोमर्यादा संपू शकते, त्यामुळे वयोमर्यादा वाढवावी. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com