esakal | महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाईकबा देवाची यात्रा रद्द; बनपुरीत कडक पोलिस बंदोबस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

बनपुरी (ता. पाटण) येथे गुढी पाडव्यापासून सुरू होणाऱ्या श्री नाईकबा देवाच्या यात्रेस लाखोंच्या संख्येने भाविक हजेरी लावतात.

महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाईकबा देवाची यात्रा रद्द; बनपुरीत कडक पोलिस बंदोबस्त

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नाईकबा देवाची येत्या 17 व 18 तारखेला होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. यात्रास्थळी भाविकांनी येऊ नये, यासाठी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येणार आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने आज येथे आयोजित बैठकीत ही माहिती देण्यात आली. 

बनपुरी (ता. पाटण) येथे गुढी पाडव्यापासून सुरू होणाऱ्या श्री नाईकबा देवाच्या यात्रेस लाखोंच्या संख्येने भाविक हजेरी लावतात. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द केली होती. अलीकडे पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने यंदाही यात्रा रद्द केल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. आज सकाळी त्यासंदर्भात येथील पोलिस ठाण्यात पोलिस उपअधीक्षक अशोकराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विलासराव जानुगडे, दादासाहेब माने, बनपुरीचे माजी उपसरपंच शिवाजीराव पवार, जानुगडेवाडीचे उपसरपंच सचिन जानुगडे, पोलिस पाटील दत्तात्रय कुंभार, संग्राम पांढरपट्टे आदींसह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. 

असं मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेलं बर; व्यापा-यांची भावना समजून घ्या : शिवेंद्रसिंहराजे 

गेल्या वर्षीप्रमाणेच यात्रा बंदचे काटेकोरपणे नियोजन करावे. महाराष्ट्र- कर्नाटकातील भविकांपर्यंत यात्रा बंदचा निरोप पोचवावा, असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले. शासनाच्या आदेशानुसार मंदिर 30 तारखेपर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहे. मंदिरात दैनंदिन पूजाअर्चा होतील. मात्र, त्या करणाऱ्या पुजाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण तातडीने करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. 

घाबरु नका! साताऱ्यात तालुकानिहाय 30 बेडचे कोरोना सेंटर; आरोग्य विभागाकडून सतर्कता

"कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार श्री नाईकबा देवाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. आदेश भंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.'' 

-अशोकराव थोरात, पोलिस उपअधीक्षक, पाटण 

साताऱ्यात कोरोनाचा विस्फोट! जिल्हाधिकाऱ्यांनी काढला कडक निर्बंधाचा आदेश; जाणून घ्या काय सुरु, काय बंद..

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image