
अपघातांची संख्या कमी करण्यासाठी जिथे दुभाजक असतील, त्या ठिकाणी गतिरोधक बसवणे गरजेचे आहे.
मलकापूर (जि. सातारा) : आगाशिवनगर येथील कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी जिथे दुभाजक असतील त्या ठिकाणी गतिरोधक बसवणे गरजेचे आहे. गतिरोधक नसल्यामुळे भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांकडून वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
आगाशिवनगर परिसराच कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गालगत रस्त्याच्या दुतर्फा जवळपास 40 कॉलन्या आहेत. दोन- तीन कॉलन्यांनंतर रस्ता क्रॉस करण्यासाठी रस्त्याला दुभाजक ठेवण्यात आले आहेत. मात्र, दुभाजकालगत गतिरोधक नसल्यामुळे वाहने भरधाव वेगात येतात. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. यापेक्षा गंभीर बाब म्हणजे या रस्त्यालगत नूतन मराठी प्राथमिक शाळा, आदर्श प्राथमिक शाळा, जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आहेत. शाळा सुटल्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी हाच मार्ग असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना या दुभाजकामधून प्रवास करावा लागतो. शाळा सुटल्यानंतर या मार्गावरती मोठी गर्दी होते. या गर्दीमधूनच भरधाव वेगाने वाहने जात असतात.
Breaking News : उदयनराजेंसह 11 कार्यकर्ते निर्दाेष; वाई न्यायालयाच निर्वाळा
अनेक छोटे अपघातही या ठिकाणावरून झाले असून, शालेय विद्यार्थी जखमीही झाले आहेत. मोठा अपघात घडण्यापूर्वी दुभाजकाच्या ठिकाणी गतिरोधक होणे अत्यंत गरजेचे आहे. हा मार्ग ढेबेवाडी फाटा ते ढेबेवाडीपर्यंत साठ फुटांचा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तो रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करून तयार झाला आहे. या रस्त्यालगत अनेक गावे वसली आहेत. अनेक गावच्या प्रवेशद्वारा लगत गतिरोधक असणे गरजेचे आहे, तरी रस्ते दुभाजक जिथे जिथे आहेत, त्या त्या ठिकाणी गतिरोधक बसवणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
चर्चा तर हाेणारच! विरोधी गटनेता बनला नगराध्यक्षा, माजी नगराध्यक्षांसह सदस्यांचा सारथी
संपादन : बाळकृष्ण मधाळे