
साताऱ्यातील रविवार पेठेतील काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी नुकतेच त्यासाठीचे काम हाती घेतले. यासाठी सातारा शहर वाहतूक शाखेसमोर असणारा मुख्य रस्ता खोदण्यात आला.
सातारा : खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचे काम करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जलवाहिनीमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या अडकलेल्या आढळल्या. या बाटल्या काढल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात पालिकेस यश आले. या कामासाठी बगाडे हॉस्पिटलसमोरील नव्याने केलेल्या मुख्य रस्त्याची खुदाई पालिका कर्मचाऱ्यांना करावी लागली.
साताऱ्यातील रविवार पेठेतील काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी नुकतेच त्यासाठीचे काम हाती घेतले. यासाठी सातारा शहर वाहतूक शाखेसमोर असणारा मुख्य रस्ता खोदण्यात आला. खुदाई पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीची तपासणी करण्यात आली. तपासणीत जलवाहिनीमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या अडकल्याचे आढळले. या बाटल्या काढल्यानंतर खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत झाला.
मेडिकल कॉलेजसाठी 495 कोटींचा निधी मंजूर; आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश
या कामावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, नगरसेवक श्रीकांत आंबेकर उपस्थित होते. वितरण टाक्यांच्या परिसरातील नागरिक प्लॅस्टिकच्या बाटल्या टाक्यांजवळ टाकत असावेत, असा अंदाज या वेळी व्यक्त करण्यात आला. यानुसार नागरिकांना पाण्याच्या वितरण टाक्यांच्या परिसरात, तसेच टाक्यांमध्ये प्लॅस्टिक बाटल्या न टाकण्याचे आवाहन मनोज शेंडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे