esakal | काव्यगायनाच्या माध्यमातून कवी गिरीशांनी मराठी कविता घराघरांत पोचवली : प्रा. बोधे
sakal

बोलून बातमी शोधा

काव्यगायनाच्या माध्यमातून कवी गिरीशांनी मराठी कविता घराघरांत पोचवली : प्रा. बोधे

आधुनिक कवितेचे जनक असणाऱ्या केशवसुतांनी काव्यप्रातांमध्ये क्रांती केली. त्यांच्या प्रभावाने केशवसुत संप्रदाय निर्माण झाला. मराठी कविता विविधांगी फुलली. परंतु, या कवींच्या अस्तानंतर काव्य क्षितिजावर अंधार निर्माण झाला होता. हा अंधार रविकिरण मंडळाच्या कवींनी दूर केला. रसिकांची अभिरुची संपन्न करण्यात कवी गिरीश व यशवंत यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे मत प्रा. श्रीकांत बोधे यांनी व्यक्त केले.

काव्यगायनाच्या माध्यमातून कवी गिरीशांनी मराठी कविता घराघरांत पोचवली : प्रा. बोधे

sakal_logo
By
इम्रान शेख

रहिमतपूर (जि. सातारा) : काव्यगायनाच्या माध्यमातून कवी गिरीश यांनी मराठी कविता घराघरांत पोचवली, असे प्रतिपादन सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रा. श्रीकांत बोधे यांनी केले. 

येथे श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कवी गिरीश शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्रात कवी गिरीशांचा 47 वा स्मृतिदिन कार्यक्रम झाला. यावेळी "कवी गिरीशांचे व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व' या विषयावर प्रा. बोधे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष अरुण माने, सहसचिव के. बी. माने, प्रा. प्रकाश बोधे, अनंतराव माने, विनायक पवार, डी. एम. भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. आधुनिक कवितेचे जनक असणाऱ्या केशवसुतांनी काव्यप्रातांमध्ये क्रांती केली. त्यांच्या प्रभावाने केशवसुत संप्रदाय निर्माण झाला. मराठी कविता विविधांगी फुलली. परंतु, या कवींच्या अस्तानंतर काव्य क्षितिजावर अंधार निर्माण झाला होता. हा अंधार रविकिरण मंडळाच्या कवींनी दूर केला. रसिकांची अभिरुची संपन्न करण्यात कवी गिरीश व यशवंत यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असेही प्रा. बोधे म्हणाले. 

कैद्यांच्या सुसह्य जीवनासाठी महिला-बालविकासचा आधार; शासनाकडूनही आर्थिक पाठबळ

छाया भोसले यांनी कवी गिरीशांच्या "कांचनमेघ' संग्रहाचा पुस्तक परिचय करून देऊन पाहुण्यांचा परिचय करून दिला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते गिरीशांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अरुण माने यांनी विविध उपक्रमांचा आढावा घेतला. कल्पना जाधव यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्र. मुख्याध्यापिका मेघा गायकवाड, मुख्याध्यापिका जयश्री सावंत, मुख्याध्यापक डी. व्ही. जगताप, शिक्षक उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top