esakal | कुरेशीनगर-फलटणात जनावरांची कत्तल; 650 किलो मांसासह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

कुरेशीनगर-फलटण येथे जाकीर कुरेशी यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या जनावरांची कत्तल सुरू होती.

कुरेशीनगर-फलटणात जनावरांची कत्तल; 650 किलो मांसासह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : फलटण येथील आखरी रस्ता कुरेशीनगर (फलटण) येथे जाकीर कुरेशी यांचे घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या जनावरांची कत्तल करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 650 किलो जनावरांचे मांस, 40 वासरे, वाहनांसह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

वाजिद जाकीर कुरेशी, इलाही हुसेन कुरेशी, गौस रहीम कुरेशी, तौसिफ अनिस कुरेशी, अरबाज नियाज कुरेशी (सर्व रा. मंगळवार पेठ, फलटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पाच जण कोणतीही परवानगी नसताना अवैधरित्या जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कुरेशीनगर-फलटण येथे जाकीर कुरेशी यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या जनावरांची कत्तल सुरू होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे फलटण शहर पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून महाराष्ट्र प्राणी संरक्षण व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्याच्या अन्वये पाच जणांवर गुन्हा दाखल केला. 

गुढी पाडव्याच्या खरेदीसाठी साता-यात नागरिकांची गर्दी; क-हाडात 30 व्यापा-यांवर कारवाई 

त्यांच्याकडून 40 वासरे दाटीवाटीने टेंपोत भरलेल्या स्थितीत मिळाली. पोलिस येण्याची चाहूल लागताच तौसिफ कुरेशी व अरबाज कुरेशी हे पळून गेले. या ठिकाणी 650 किलो जनावरांचे मांस, 40 लहान जर्शी गाईची वासरे, टाटा कंपनीचा टेम्पो, इनोवा कार, इलेक्‍ट्रॉनिक वजन काटा, दोन मोबाईल हॅंडसेट असा एकूण रुपये 32 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. फलटण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भारत किंद्रे, सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ गायकवाड, सचिन रावळ, सहायक पोलिस उपनिरीक्षक शिंदे, घाटगे, खाडे, येळे, करपे, हिवरकर, गोसावी, जाधव, भिसे यांनी ही कारवाई केली. सहायक पोलिस निरीक्षक सचिन रावळ तपास करीत आहेत. 

जिल्हाधिकारी साहेब! बगाड यात्रेतील धाेका टाळण्यासाठी बावधनसह वाड्यावस्त्यांवरील प्रत्येकाची काेराेनाची चाचणी करा 

रेमडिसिव्हिर आणा; मगच दाखल व्हा! खासगी रुग्णालयांकडून सक्ती

संपादन : बाळकृष्ण मधाळे