दक्षिण मांड नदीवरील पूल पाडला; कऱ्हाड-चांदोली मार्गावर शेतकऱ्यांची कसरत

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

उंडाळे (जि. सातारा) : कऱ्हाड-चांदोली रस्त्यावरील ओंड-उंडाळे गावानजीकचा दक्षिण मांड नदीवरील पूल जीर्ण झाल्यामुळे व नवीन रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे पाडण्यात आला. त्यामुळे सर्व पर्यायी वाहतूक उंडाळे-तुळसण मार्गाने वळविण्यात असली तरी हलकी वाहतूक ओंड, टकराची मळी, उंडाळे अशी सुरू आहे. तेथील रस्त्याची खडी पूर्ण उखडून चाळण झाली आहे. या रस्त्याची गेल्या दहा वर्षांपासून दुरुस्ती केलेली नाही. 

उंडाळे, टकराची मळी, ओंड रस्ता शेतामध्ये ये-जा करण्यासाठी तसेच शेतमाल वाहतूक करण्यासाठी वापरला जात होता. सध्या हा पूल पाडण्यात आला. त्यामुळे या रस्त्यावरून हलकी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता उखडला आहे. शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या बाजूने झाडी वाढली आहे. बांधकाम विभाने दहा वर्षांपासून रस्त्याची डागडुजी केलेली नाही. 

रस्त्यावरून जाताना बांधलेल्या साकव पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. रस्ता अरुंद, खडी पूर्ण उखडली आहे. त्यामुळे वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, ओंड फाट्यावरून सवादे, शेवाळवाडी, उंडाळे अशी वाहतूक सुरू आहे. तुळसण फाट्यावरून उंडाळे असा रस्ता आहे. या रस्त्यावरून एसटी, चारचाकी, दुचाकी वाहतूक सुरू असून या रस्त्यावरून पाइपलाइनसाठी चरी खोदलेल्या आहेत. त्यामुळे मोठे खड्डे पडले आहेत. बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com