esakal | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीत नियमांचे उल्लंघन नको; पोलिस उपअधीक्षकांचे जनतेला आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला शासनाने अनेक निर्बंध लादले असून, त्याबाबत प्रशासनाने दुजाभाव करू नये.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीत नियमांचे उल्लंघन नको; पोलिस उपअधीक्षकांचे जनतेला आवाहन

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बाधितांची संख्या दुपटीने वाढत असून, यामध्ये फारशी लक्षणे आढळत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे (खराडे) यांनी केले.
 
वाई पोलिस प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करून प्रशासनास सहकार्य करावे, तसेच आरोग्यविषयक सामाजिक उपक्रम राबवावेत, प्रत्येक मंडळांनी गरजू रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्‍शनसाठी सहकार्य करावे, असेही त्या म्हणाल्या. या वेळी तहसीलदार रणजित भोसले, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. जानवे म्हणाल्या, ""जयंतीबाबत शासनाने जी नियमावली दिली आहे. तिचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. यानिमित्ताने निघणाऱ्या मिरवणुका काढू नयेत. आंबेडकर जयंतीला होणारा खर्च हा गावातील नागरिकांसाठी मास्क, सॅनिटायझर, इंजेक्‍शनसाठी व कोरोना बाधितांवरील उपचारासाठी खर्च करावा. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे.''

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारांचा शासनाला विसर; तब्बल चार वर्षांपासून पुरस्काराची घोषणाच नाही!

अशोकराव गायकवाड म्हणाले, ""डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला शासनाने अनेक निर्बंध लादले असून, त्याबाबत प्रशासनाने दुजाभाव करू नये, तरीही आंबेडकर अनुयायांनी घरातच जयंती साजरी करून समाजापुढे आदर्श ठेवावा.'' या वेळी तहसीलदार रणजित भोसले, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, रिपब्लिकन युवक प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांनी जयंती साजरी करण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी संतोष जाधव, श्रीकांत निकाळजे, रुपेश मिसाळ, जगदीश कांबळे, सतीश वैराट यांनी शंका उपस्थित करीत मत प्रकट केले. या वेळी आंबेडकर अनुयायी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

Mini Lockdown : प्रशासन विरुद्ध जनता संघर्ष उफाळणार; पालकमंत्र्यांनी समन्वयाची जबाबदारी घेणे अपेक्षित

VIDEO : एकदम झक्कास! काळजाचा ठोका चुकवणारा 1800 फूट कोकणकडा कोणेगावच्या गिर्यारोहकाकडून सर

खंबाटकी घाटात अग्नितांडव; का झाला गाड्यांचा स्फोट?, वनक्षेत्रपाल सांगतात नेमकं कारण..

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image