सडक सुरक्षा-जीवन रक्षा! रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कऱ्हाडला जनजागृती रॅली

हेमंत पवार
Saturday, 23 January 2021

सडक सुरक्षा-जीवन रक्षा या बोधवाक्‍यावर रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत येथील आरटीओ कार्यालयापासून शहरातील दत्त चौकापर्यंत वाहनांची जनजागृती रॅली काढण्यात आली. पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या हस्ते रॅलीचे उद्‌घाटन झाले. 

सडक सुरक्षा-जीवन रक्षा या बोधवाक्‍यावर रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत येथील आरटीओ कार्यालयापासून जनजागृती रॅली काढण्यात आली. पोलिस उपअधीक्षक डॉ. पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सगरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला.

निवडणुकीसाठी 100 कोटी खर्च करू, तुम्हाला मंत्रीपद देऊ; भाजपची राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला ऑफर

वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील, रोटरी क्‍लब, रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, वाहतूक शाखेचे कर्मचारी, आरटीओ कार्यालयाचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते. ही रॅली आरटीओ कार्यालयापासून विमानतळासमोरून कोल्हापूर नाक्‍यावरून दत्त चौकापर्यंत काढण्यात आली. रॅलीमध्ये सहभागी वाहनांवर रस्ता सुरक्षेविषयी जनजागृतीपर फलक लावण्यात आले होते. दत्त चौकामध्ये रॅलीचा समारोप झाला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Road Safety Campaign At Karad