esakal | कौतुकास्पद! खेड्यातील मुलीच्या यशाने जळवकरांची छाती अभिमानाने फुलली; साक्षी झाली पहिली डॉक्‍टर

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

डोंगरावर असलेल्या छोट्या खेड्यातील मुलीच्या यशाने जळवकरांची छाती अभिमानाने फुलली आहे.

कौतुकास्पद! खेड्यातील मुलीच्या यशाने जळवकरांची छाती अभिमानाने फुलली; साक्षी झाली पहिली डॉक्‍टर
sakal_logo
By
यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि. सातारा) : मूळची जळव (ता. पाटण) येथील असणारी मात्र सध्या मुंबईस्थित असलेल्या साक्षी राजाराम पवार ही बीडीएसची पदवी घेत जळवसारख्या छोट्या खेड्यातील पहिली डॉक्‍टर बनली आहे. यामुळे जळवच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या यशाचे जळवसह पंचक्रोशीतून कौतुक होत असून, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

साक्षीचे वडील राजाराम यांचे प्राथमिक शिक्षण मणदुरे (ता. पाटण) येथे झाले. पुढील शिक्षण मुंबईत पार पडले. सध्या ते अदानी पॉवरमध्ये अभियंतापदावर कार्यरत आहेत. दुसऱ्या सुनीता या एम. ए. बी. एड. असून, शाळेवर प्रिन्सिपल आहेत. तिसरे संजय हे सीए असून, एका मल्टीनॅशनल कंपनीत आहेत. शेवटचा भाऊ विकास हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. 

महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण माहितीय?; प्रसिध्द अभिनेता आमिर खाननेही केली या गावात पिक्चरची शुटिंग

पवार कुटुंबाची मुंबई ही कर्मभूमी असली तरी गावची नाळ कायम आहे. अशा उच्चशिक्षित घराची पार्श्वभूमी असलेल्या साक्षीनेही आपल्या घराचा वारसा पुढे नेला आहे. पुढे विदेशात डेंटिस्टचे उच्चशिक्षण घेण्याचे तिचे ध्येय आहे. डोंगरावर असलेल्या या छोट्या खेड्यातील मुलीच्या यशाने जळवकरांची छाती अभिमानाने फुलली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे