कोरोनावर मात करत शिवेंद्रसिंहराजेंनी करुन दाखवलं; जिल्हा बॅंकेने ओलांडला तब्बल 150 कोटींचा टप्पा

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : कोरोना व इतर अडचणींवर मात करत सातारा जिल्हा बॅंकेने ता. 31 मार्चअखेरीस 150 कोटींचा करपूर्व नफा झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे. शेतकरी, सभासद, संचालक, कर्मचारी आणि इतरांनी केलेल्या सांधिक सहकार्यामुळेच जिल्हा बॅंक पुन्हा आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहिली असून सहकार्य करणाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. 

या पत्रकात शिवेंद्रसिंहराजेंनी बॅंकेच्या प्रगतीचा आढावा मांडला आहे. चालू आर्थिक वर्षात जिल्हा बॅंकेने 13 हजार 845 कोटींचा संमिश्र व्यवसायाचा टप्पा ओलांडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत संमिश्र व्यवसायात 978 कोटींची वाढ झाली असून आर्थिक वर्षाअखेरीस 843 कोटी 5 लाखांच्या ठेवी बॅंकेकडे आल्या आहेत. बॅंकेने 5 हजार 415 कोटींची कर्जे वाटली असून सद्य:स्थितीत बॅंकेची 3 हजार 975 कोटींची गुंतवणूक आहे. चालू आर्थिक वर्षात बॅंकेस ढोबळ करपूर्व नफा 150 कोटी झालेला असून गतवर्षीच्या तुलनेत नफ्यात 16 कोटी 55 लाखांची वाढ झाली आहे. सलग 15 वर्षे बॅंकेने शून्य टक्के एनपीए राखण्यात यश मिळवले आहे, असे त्यांनी नमूद केले. 

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक, साखर कारखाने आणि इतर सहकारी संस्थांनी बॅंकेवर दाखविलेल्या विश्वासामुळेच बॅंकेस हे उत्तुंग यश प्राप्त करणे शक्‍य झाल्याचे शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले आहे. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी बॅंकेने सभासदांना 12 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले होते. मात्र, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार त्याचे वितरण बॅंकेस करता आलेले नाही. कोरोना काळात बॅंकेने सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांना 1 कोटी रुपयांचे जीवनावश्‍यक साहित्याचे वितरण केले आहे.

नागरिकांचा आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे बॅंकिंग व्यवहारातील सहभाग वाढावा, यासाठी अनेक ऍप्सचा आधार बॅंकेने घेतला असून ग्राहकांना 320 शाखा, 55 एटीएम सेंटर, मोबाईल एटीएमच्या माध्यमातून सेवा पुरविण्यात येत आहे. बॅंकेच्या यशात ज्येष्ठ संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, संचालक व सहकार व पणनमंत्री, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, अन्य संचालकांचा सहभाग असल्याचेही शिवेंदसिंहराजेंनी पत्रकात नमूद केले आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com