esakal | साताऱ्यात व्यापाऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; केंद्र सरकारविरुध्द घोषणाबाजी
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

व्यापाऱ्यांच्या देशपातळीवरील कॉन्फडरेनश ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने जीएसटीतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती.

साताऱ्यात व्यापाऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; केंद्र सरकारविरुध्द घोषणाबाजी

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : जीएसटीतील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद ठेवत सहभाग नोंदवला. या बंदमुळे साताऱ्यातील मुख्य बाजारपेठ ओस पडली होती. 

व्यापाऱ्यांच्या देशपातळीवरील कॉन्फडरेनश ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने जीएसटीतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. मागणी करूनही त्यावर कार्यवाही न झाल्याने व्यापाऱ्यांनी देशव्यापी व्यापार बंदची हाक दिली होती. या बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय सातारा जिल्हा व्यापारी संघटनेने घेतला होता. 

ज्याच्यात हिम्मत असेल, त्याने पुढे यावे; शिवपुतळ्यावरुन उदयनराजेंचे प्रशासनाला थेट आव्हान

यानुसार बंदमध्ये शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला. दुकानांसह इतर सर्व व्यवसाय बंद ठेवत या व्यापाऱ्यांनी केंद्र सरकाराचा निषेध केला. या बंदमुळे साताऱ्यातील मुख्य बाजारपेठ शुक्रवारी ओस पडली होती. या बंदला ट्रान्स्पोर्ट असोसिएशननेही पाठिंबा दर्शवला होता. त्यांच्या पाठिंब्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुद्धा काही काळ ठप्प झाली होती. या बंदच्या पार्श्‍वभूमीवर शहराच्या विविध भागांत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image