
वडूज-कातरखटाव रस्त्यावर एक एकर क्षेत्रातील ऊस जळून अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
वडूज (जि. सातारा) : वडूज-कातरखटाव रस्त्यावर एक एकर क्षेत्रातील ऊस जळून अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना काल रात्री घडली.
याबाबत सोमनाथ एकनाथ राऊत (रा. वडूज) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत श्री. राऊत यांनी दिलेल्या तक्रारीतील माहितीनुसार, कातरखटाव रस्त्यावर माळी मळा नावाच्या शिवारात राऊत यांच्या शेत जमिनीत एक एकर क्षेत्रात उसाची लागवड केली आहे. काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास श्री. राऊत यांच्या उसाला आग लागल्याचे समजले.
शरद पवारांचे आत्मचरित्र हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावे; सदाभाऊंचा खोचक टोला
त्यानंतर नजीकच्या ग्रामस्थ व युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. सुमारे दोन तास आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, वाऱ्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी निर्माण होत होत्या. या आगीत राऊत यांचे 2 लाख 50 हजार रुपयांचे ऊस पिकाचे नुकसान झाले आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे