esakal | बुध लसीकरणात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; ज्येष्ठांसह 45 वयोगटातील नागरिकांची केंद्रावर मोठी गर्दी

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

उन्हापासून संरक्षणासाठी लसीकरण केंद्रावर मंडप, कूलर, थंड पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

बुध लसीकरणात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; ज्येष्ठांसह 45 वयोगटातील नागरिकांची केंद्रावर मोठी गर्दी
sakal_logo
By
केशव कचरे

बुध (जि. सातारा) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आज लसीकरणास प्रारंभ झाला. बुध व परिसरातील लोकांना डिस्कळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन लस घेणे गैरसोयीचे होत असल्याने सरपंच अभय राजेघाटगे यांच्या प्रयत्नातून बुध प्राथमिक उपकेंद्रात लसीकरणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

उन्हापासून संरक्षणासाठी लसीकरण केंद्रावर मंडप, कूलर, थंड पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. बुध उपकेंद्रावर लसीकरण सुरू झाल्याचे समजताच बुध, काटेवाडी, पांगरखेल, वेटणे, रणसिंगवाडी, फडतरवाडी, करंडओढा व परिसरातील लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या लोकांनी सकाळी आठ वाजल्यापासून केंद्रासमोर प्रचंड गर्दी केली.

जीवापल्याड जपलेली आंब्याची बाग आगीच्या भक्ष्यस्थानी; कांदाटी खोऱ्यात 700 झाडे वणव्यात खाक

यामध्ये ज्येष्ठ नागरिक व 45 वयोगटातील नागरिकांची संख्या लक्षणीय होती. लसीकरणास वेळ लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. मंडपातील गर्दीने सोशल डिस्टस्निंगचा बोजवारा उडवला होता. कोरोनापासून वाचण्यापेक्षा ही गर्दीच कोरोनाला निमंत्रण देणारी तर ठरणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे. 

घरगुती समारंभात आटपाडी तालुक्‍यातील पाहुण्यांची मोठी गर्दी; गारुडीत 20 जणांना कोरोनासदृश लक्षणे

संपादन : बाळकृष्ण मधाळे