
मायणी (जि. सातारा) : येथील चांदणी चौकात झालेल्या बलात्कार प्रकरणातील संशयितास पोलिसांनी 12 तासांत अटक केली. प्रभाकर यल्लप्पा पगडम (वय 42, मूळ रा. पगडीयाला, ता. नंदीकोट, जि. कर्नुल आंध्र प्रदेश) असे त्याचे नाव असून, न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्याचे आदेश दिले.
याबाबतची माहिती अशी, येथील चांदणी चौकात दहिवडी रस्त्याच्या बाजूला सनम वॉच अँड गिफ्ट हाउससमोर 60 ते 65 वर्षे वयाच्या वेडसर महिलेवर (मूळ रा. मुद्देबिहळ, ता. भोगवाडी, जि. विजापूर) 35 ते 40 वर्षे वयाच्या पुरुषाने मारहाण करीत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सनम वॉच अँड गिफ्ट हाउससमोरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यामध्ये संबंधित बलात्कार करणारा संशयित दृष्टीस आला.
काही पोलिस कर्मचाऱ्यांनी प्राप्त फुटेजमधील संशयिताची छबी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केली. त्याचा चांगला उपयोग झाला. विटे (जि. सांगली) येथील काही तरुणांनी संबंधित वर्णनाची व्यक्ती तेथे आढळून आल्याचे पोलिसांना सांगितले. मिळालेल्या माहितीवरून, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिस दूरक्षेत्रातील सहायक फौजदार गुलाबराव दोलताडे, पोलिस नाईक बापूराव खांडेकर, पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे आदींच्या पथकाने काल (शुक्रवार) पाच वाजता संशयितास ताब्यात घेतले. त्यास वडूज येथील न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्याचे आदेश दिले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर करीत आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.