'भारत माता की जय'च्या घोषात कऱ्हाडात 'विजय दिवस'

'भारत माता की जय'च्या घोषात कऱ्हाडात 'विजय दिवस'

कऱ्हाड (जि. सातारा) : बांगलामुक्ती संग्रामात भारतीय सैन्य दलाने मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ येथे आज विजय स्तंभास मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याही समाधिस्थळीही अभिवादन करण्यात आले. या वेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या. 

भारतीय सैन्य दलाच्या विजयाचे साक्षीदार असलेल्या निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या पुढाकारातून येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम व परिसरात दर वर्षी विजय दिवस समारोहाचे आयोजन केले जाते. देशात दिल्लीनंतर फक्त तो कऱ्हाडमध्ये साजरा केला जातो. विजय दिवस समारोहासाठी दर वर्षी लष्करी शस्त्रास्त्र, जवान, बॅण्डपथक, श्वानपथक आदींच्या चित्तथरारक कसरतींचेही आयोजन केले जाते. त्याला पश्‍चिम महाराष्ट्रातून आबालवृद्ध उपस्थित राहतात. मात्र, यंदा कोरोनामुळे तो स्थगित करण्यात आला. विजय दिवसाच्या पार्श्वभूमीवर विजय दिवस समितीच्या वतीने मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत आज विजयस्तंभास अभिवादनाचा कार्यक्रम झाला. 

खासदार श्रीनिवास पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, निवृत्त कर्नल एम. डी. कुलकर्णी, नगरसेवक सौरभ पाटील नियोजन सभापती विजय वाटेगावकर, लेफ्टनंट कमांडर दिग्विजय जाधव, ऑनररी लेफ्टनंट बाबूराव कराळे, दिलीप चव्हाण, सलीम मुजावर, अंशुमन पाटील, विजय दिवस समितीचे अरुण जाधव, विनायक विभूते, चंद्रकांत जाधव, विलासराव जाधव, प्रा. बी. एस. खोत, प्रा. रजनिश पिसे, प्राचार्य सतीश घाटगे, प्रा. जालिंदर काशिद, रमेश पवार, दिलीप पाटील, मीनल ढापरे, पौर्णिमा जाधव, मीनाक्षी जाधव, अरुणा जाधव, साधना राजमाने, आसमा इनामदार, विष्णू पाटसकर, रत्नाकर शानभाग, भरत कदम, सतीश बेडके, सुनील कणसे, दीपक कणसे यांनी विजय स्तंभास अभिवादन केले. तत्पूर्वी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक काकासाहेब करबंळेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com