अंगापूर वंदनची यात्रा दुसऱ्या वर्षीही रद्द; साताऱ्यात जमावबंदी लागू

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

अंगापूर (जि. सातारा) : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू झाल्याच्या अनुषंगाने अंगापूर वंदन (ता. सातारा) येथील ग्रामदैवत ऐवार्जीनाथाची वार्षिक यात्रा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे. 

ही यात्रा रविवारी (ता. चार) व सोमवारी (ता. पाच) होत असून, आता केवळ मोजक्‍या मानकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करून साजरी करण्यात येणार आहे. ऐवार्जीनाथ सभामंडपात ग्रामपंचायतीतर्फे यात्रेच्या अनुषंगाने ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ग्रामपंचायत पदाधिकारी, सातारकर ग्रामस्थ, ऐवार्जीनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

दोन दिवस चालणारी यात्रा ही संपूर्ण शाकाहारी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यात्राकाळात गावाबाहेरून येणाऱ्यांवर ग्रामपंचायतीच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, गावचे पुणेकर निवासी व स्थानिक ग्रामस्थांच्या संकल्पनेतून ग्रामदैवत ऐवार्जीनाथ देवालयात नक्षीदार सागवाणी मेघडंबरी व "श्रीं'ची मूर्ती चांदीने अंलकृत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ऐवार्जीनाथ ट्रस्ट व विविध ठिकाणी असणाऱ्या अंगापूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून वैकुंठरथ व शिवनाथ स्मशानभूमी सुशोभीकरण ही दोन्ही कामे लोकसहभागातून यात्रा बचतीच्या खर्चातून सुरू करण्यात आली आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com