कऱ्हाडातील 19 हजार मिळकतदारांची चिंता मिटणार ?

कऱ्हाडातील 19 हजार मिळकतदारांची चिंता मिटणार ?

कऱ्हाड : शहरात पालिकेने २०२० या आर्थिक वर्षात पाच टक्के घरपट्टी वाढवली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती वाढीव पाच टक्के घरपट्टी रद्द केली जाण्याची शक्यता आहे. ही घरपट्टी रद्द करावी त्याबाबतचा प्रस्ताव यशवंत जनशक्ती आघाडीने दिला आहे, अशी माहिती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी दिली. वाढीव पाच टक्के घरपट्टी रद्द झाल्यास कऱ्हाडकरांना दिलासा मिळाला आहे. 

शहरात रहिवास व वाणिज्य 19 हजार इतक्या मिळकती आहेत. या मिळकतींवर पालिका सध्या संकलीत कर आकारते आहे. त्यात पाच टक्के वाढ केली होती. ती यंदाच्या 2020 च्या आर्थिक वर्षातील कालावधीत वाढीव घरपट्टी आकारण्यात येणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ती रद्द करावी, अशी शिफारस यशवंत विकास आघाडीने केली आहे. त्यांनी मांडलेल्या उपसुचननुसार त्याचा प्रस्तावही दिला जाणार आहे. त्यामुळे कऱ्हाडकरांना दिलासा मिळाला आहे. याबाबत श्री. यादव म्हणाले, लॉकडाऊनमुळे शहरातील नागरीकांना मोठ्या आर्थिक गोष्टीशी सामना करावा लागतो आहे. त्या सगळ्य़ा गोष्टी लक्षात घेवून पाच टक्के करवाढ रद्द करण्याचा निर्णय घेत आहोत. आरोग्य विभागाच्या तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना तीन हजार रूपये तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी सहा हजार रूपये प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे. शारदा क्लीनीक व सह्याद्री हॉस्पीटल येथे त्यांची आरोग्य तपासणी विनामुल्य केली जाणार आहे.

पालिकेतील नगराध्यक्षा, उपाध्यक्षांसहस सर्व सभापती, नगरसेवकांचे एप्रिल पासूनचे मानधन, बैठकीचा संपू्र्ण भत्ता पंचवार्षिक संपपेपर्यंत आपत्कालीन व्यवस्थेसाठी जनरल फंडात वर्ग करावा. त्याचाही प्रस्ताव दिला आहे. त्यालाही एकमुखी मंजुरी मिळाली आहे. कोरोनाच्या रूग्णांवर अत्यसंस्कार करण्यासाठी जिल्ह्यात सातारा व कऱ्हाड अशा दोन स्मशानभुमी आहेत. त्या स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करण्यात येणार आहे. तेथेच त्यांना सॅनिटायझरिंगही करण्यात येईल. पालिकेकडे रूग्णवाहीका नाही तसेच शववाहीकाही नाही. ती दोन्ही वाहने तत्काळ खरेदी करण्यात येणार आहेत. त्याच्या खर्चासाठी तत्काळ मंजूरी देण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याचा महत्वाचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यासाठी पाच ते सहा वेगवेगळ्या कंपन्यांना बोलावून त्याबाबत अंतीम निर्णय घेण्यात येणार आहे. 


कोरोनाबरोबरच पावसाळाही येतो आहे. त्या अनुषंगाने संभाव्य महापूर लक्षात घेवून पावसाळ्यापूर्वीच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे. त्याशिवाय संभाव्य पुराचा धोका लक्षात घेवून विविध उपाय योजना राबविण्याचा आराखडाही तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यालाही गती येणार आहे. 

राजेंद्र यादव, गटनेते, यशवंत जनशक्ती आघाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com