ग्रामस्थांच्या काळजीने महाबळेश्‍वर, पाटण, जावळी तालुक्‍यात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असा पुढाकार

ग्रामस्थांच्या काळजीने महाबळेश्‍वर, पाटण, जावळी तालुक्‍यात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असा पुढाकार
Updated on

कऱ्हाड : निसर्ग वादळाच्या काळात जिल्हा प्रशासनाने महाबळेश्‍वर, पाटण, जावळी तालुक्‍यांतील काही गावांमध्ये आपत्तीची सूचना देण्यासाठी प्रथमच पिनकोड बेस मेसेज सिस्टिमचा वापर केला. त्याच धर्तीवर जिल्ह्यात संभाव्य पूरपरिस्थिती काळातही ही पद्धत राबवली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी येथे पत्रकारांना दिली.

संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची बैठक जिल्हाधिकारी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी मनीषा ओहुळे यावेळी उपस्थित होत्या.
 
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बैठक घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज बैठक झाली. यंदा संभाव्य पूरपरिस्थितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे. कऱ्हाड, पाटणला प्रत्येकी दोन रबर बोटी व साहित्य देवून आपत्ती प्रशिक्षण घेतले आहे. यंदाही पूरस्थिती उद्‌भवल्यास शहरासह नदीकाठच्या भागात पूररेषेवरील नागरिकांचे पुनर्वसन करताना अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आणि सुरक्षित अंतराची बाब गृहित धरून स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांसाठी जास्त जागा देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
 
सिंह म्हणाले, पुराला अनेक करणे आहेत. 1914 नंतर गेल्या वर्षी प्रथमच विक्रमी पाऊस झाला. कऱ्हाडला सरासरी 1600 टक्के विक्रमी पाऊस झाला. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन उपाययोजना करत आहे. कऱ्हाड तालुक्‍यासाठी चार बोटी उपलब्ध आहेत. गटविकास अधिकाऱ्यांकडून नादुरुस्त असलेल्या दोन फायबर बोटींची दुरुस्ती केली जाईल. त्यामुळे तालुक्‍यासाठी सहा बोटी उपलब्ध होवून आपत्ती काळात मदतकार्यासाठी याचा मोठा फायदा होईल. पिनकोड बेस मेसेज सिस्टिमचा संभाव्य महापूर परिस्थितीतही वापर केला जाईल. त्यामुळे एकाचवेळी अनेक लोकांना सतर्कतेचे संदेश पाठवणे शक्‍य होईल. गेल्या वर्षी पूरपरिस्थितीत महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रकचालक अडकून पडल्याने त्यांचे हाल झाले. या काळात लोकांनी त्यांना महत्त्वपूर्ण मदत केली. यावर्षी अशी परिस्थिती उद्‌भवल्यास ट्रकचालकांना प्रशासनातर्फे मदत केली जाईल. पूरस्थितीनंतर नदीपात्रालगच्या अतिक्रमणांबाबत मार्ग काढला जाईल. 

...अशी आहे वॉर्निंग सिस्टिम 

एखाद्या गावातील लोकांना सतर्कतेसंदर्भात मोबाईलवर एकत्रित संदेश पाठवायचा असल्यास पिनकोड बेस्ड वॉर्निंग सिस्टिमचा वापर केला जातो. त्याद्वारे त्या गावाचा पिनकोड वापरून गाव अथवा त्यातील ठराविक भागातील लोकांसाठी तेथील मोबाईल टॉवरवर कार्यान्वित असलेल्या सर्वच मोबाईलवर एकाचवेळी सतर्कतेचा संदेश पाठवला जाईल. संभाव्य पुरावेळी नदीकाठच्या गावांच्या पिनकोड यादीवरून संबंधित नदीकाठच्या गावांतील मोबाईलवर एकाचवेळी सतर्कतेच्या सूचना देणे शक्‍य होणार आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूरसाठी एनडीआरएफ तैनात
 
मराठा जात प्रमाणपत्र असे काढा

या शुक्रवारी तुम्ही बदलू शकता तुमचं नशीब; 130 मिलियनचा जॅकपॉट जिंकण्याची मोठी संधी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com