
Satara’s Vaishnavi & Rutuja sparkle in China hockey tournament; India celebrates a shining victory.
Sakal
-सुनील शेडगे
नागठाणे : अलीकडील काळात विविध क्रीडा प्रकारांत साताऱ्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटविताना दिसत आहेत. त्याचीच प्रचिती वैष्णवी फाळके अन् ऋतुजा पिसाळ या जिल्ह्यातील महिला हॉकीपटूंनी दिली. आपल्या खेळाची चमक दाखवीत त्यांनी भारतीय महिला हॉकी संघाला आशियाई स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवून दिले.