Satara : कवी बा. सी. मर्ढेकरांच्या स्मारक उद्‌घाटनाला मिळेना मुहूर्त

साहित्यप्रेमींकडून इमारत खुली करण्याची मागणी
कवी बा. सी. मर्ढेकरांच्या
कवी बा. सी. मर्ढेकरांच्याsakal

सायगाव :

गणपत वाणी बिडी पिताना,

चावायचा नुसतीच काडी;

म्हणायचा अन् मनाशीच की,

या जागेवर बांधीन माडी।।

यासह अशा अनेक अजरामर कवितांचे युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर यांचे मर्ढे (ता. सातारा) येथील लाखो रुपये खर्च करून उभे राहिलेले स्मारक पूर्ण होऊन देखील आजही उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर यांची आज (गुरुवार) ११३ वी जयंती. मराठी कवितेला एक नवा चेहरा देणारे, मराठी समीक्षेत नव्या संकल्पना रुजवणारे युगप्रवर्तक कवी बाळ सीताराम मर्ढेकर यांच्या येथील स्मारकाच्या लोकार्पण प्रक्रियेसाठी दोन वर्षांपूर्वी जिल्ह्या प्रशासनाने २० लाख १७ हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे या युगप्रवर्तक कवीचे स्मारक सर्वसामान्यांसाठी लवकर खुले होईल, यामुळे साहित्यिक वर्तुळात आनंदाचे वातावरण होते. मर्ढेकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा साताऱ्याचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी याबाबतचा आदेशही दिला होता.

त्यानुसार मर्ढे गावातील भैरवनाथ मंदिर चौकात यापूर्वीच बांधून पूर्ण झालेल्या स्मारकाची दुरुस्ती, सुशोभीकरण तसेच मर्ढेकरांचे तैलचित्र, जीवनपट, त्यांची ग्रंथसंपदा व तद्‌नुषंगिक कामे पूर्ण करण्यासाठी हा निधी वापरला व कामे पूर्ण झाली आहेत. लवकर स्मारकाचे लोकार्पण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्यापही स्मारक खुले होण्याच्या प्रतीक्षेत असल्याने साहित्यप्रेमींमध्ये नाराजी आहे.

अनेक देणगीदारांनी यापूर्वीच ग्रंथसंपदा व पुस्तके ठेवण्यासाठी स्मारकाला कपाटे देणगी स्वरूपात दिली आहेत. त्यामुळे या ठिकाणी एक सुसज्ज असे ग्रंथालय निर्माण झाले आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा राहिली आहे ती, इमारतीच्या लोकार्पणाची. मात्र, नेमकी काय अडचण आहे, तेही समजत नसल्याने साहित्यप्रेमींना आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मर्ढे ग्रामस्थदेखील यासाठी वारंवार पाठपुरावा करत असून लवकर ही इमारत खुली करावी, अशी मागणी करत आहेत. येथे भेट देणाऱ्या साहित्यप्रेमींमुळे मर्ढे गावाच्या वैभवात भर पडणार आहे.

मर्ढेकर स्मारक इमारतीचे लोकार्पण करून ते साहित्यप्रेमी व अभ्यासकांसाठी खुले व्हावे. ज्या उद्देशाने इमारत साकारली आहे, तिचे उद्दिष्ट पूर्णत्वास जाऊन नवोदित साहित्यिकांना व येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक राहील.

- अजित जाधव, बा. सी. मर्ढेकर साहित्य अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com