esakal | हनी ट्रॅप करुन मोहिते-पाटलांना अडकविण्याचा प्रयत्न; एकास अटक

बोलून बातमी शोधा

Crime News
हनी ट्रॅप करुन मोहिते-पाटलांना अडकविण्याचा प्रयत्न; एकास अटक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा डाव आखल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या मुख्य संशयितासह दोघांवर याच ठिकाणी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. शैलेश शिवाजीराव मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि. पुणे) या मुख्य संशयितासह राहुल किसन काडंगे (रा. चाकण, जि. पुणे) या त्याच्या साथीदारावर हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत संबंधित युवतीने फिर्याद दिली आहे.

बुधवारी संबंधित युवती येथील तिच्या घरात एकटी होती. ते घरात आले. याबाबत तिने जाब विचारला. त्यानंतर अश्‍लील वर्तन करून ते दोघे निघून गेले, तसेच शैलेशने त्याच्या मोबाइलवरून माझ्या मोबाईलवर अश्‍लील मेसेज करूनही विनयभंग केल्याचे संबंधित युवतीने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक सजन हंकारे तपास करत आहेत. दरम्यान, शैलेश हा जामीन घेण्यासाठी साताऱ्यात आला होता. त्यानंतर युवतीच्या घरी जाऊन त्याने विनयभंग केल्याचे समोर आले आहे. एवढे निर्बंध असताना तो साताऱ्यात कसा आला याची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: मोहिते-पाटलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढ; युवतीने धुडकावली Offer

सोमनाथ शेडगेला पोलिसांनी घेतले ताब्यात

खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी 'हनी ट्रॅप' रचणाऱ्या तिघांविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा नोंद झाला होता. याप्रकरणी सोमनाथ दिलीप शेडगे (रा. सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर दोघांचा शोध सातारा तालुका पोलिस घेत आहेत. खेड-आळंदीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना बदनाम करण्याच्या हेतूने त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा डाव शैलेश शिवाजी मोहिते-पाटील याच्यासह त्याच्या तीन साथीदारांनी आखला होता. मात्र, या डावातील युवतीने याबाबतची माहिती आमदार मोहिते पाटील यांच्या पुतण्या मयुर साहेबराव मोहिते पाटील यांना दिली.

कोतवालांना सरसकट सहावे वेतन लागू करा; राज्य संघटनेची सरकारकडे मागणी

त्यामुळे मयुरने सातारा तालुका पोलिस ठाण्यात संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी साताऱ्यातील सोमनाथ दिलीप शेडगे याला ताब्यात घेतले आहे. इतर दोघांचा शोध सातारा तालुका पोलिस घेत आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.

दहाव्यात अपयश, अकराव्या प्रयत्नांत बाजी; सूर्याच्यावाडीचा सुशांत 'सूर्या'सारखा तळपला!