
सातारा : विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दरोडा, जबरी चोरी व चेन स्नॅचिंग असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील दोघांसह चोरीचे सोने विकत घेणाऱ्या दोन सराफांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) अटक केली आहे. त्यांच्याकडून २३ गुन्ह्यांतील तब्बल अर्धा किलो सोने व दुचाकी असा सुमारे ५२ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात यश आल्याची माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.