
सातारा: जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. उत्सवात नियमांचे पालन करून विसर्जन मिरवणुका पार पाडण्यासाठी पोलिस दल सज्ज झाले आहे. विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. त्यासाठी कायदा व सुव्यवस्थेसाठी कडक नियम आखले गेले आहेत. हे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.