कॉंग्रेसच्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका : भाजप प्रवक्ते उपाध्ये

Satara Latest Marathi Political News
Satara Latest Marathi Political News

सातारा : केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी विविध प्रकल्प व इतर तरतुदी मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. कॉंग़्रेसच्या काळापेक्षा मोदी सरकारचा अर्थसंकल्प चांगला असून कॉंग़्रेसच्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे सांगत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी कॉंग्रेसवर टीका केली. 

केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी श्री. उपाध्ये यांची साताऱ्यात पत्रकार परिषद झाली. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, विकास गोसावी, सिध्दी पवार, आशा पंडित आदी उपस्थित होते. श्री. उपाध्ये म्हणाले, ""कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने भारतालाही त्याचा सामना करावा लागत आहे. तरीदेखील भाजपने अर्थसंकल्पात सर्व घटकांसाठी तरतुदी केल्या आहेत. गरीब कल्याण आणि महिला सक्षमीकरण, आरोग्य व्यवस्था सुदृढ करणे, कृषी सुधारणा आणि शेतकरी हिताला प्राधान्य, शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन, पायाभूत सुविधांच्या विकासावर अर्थसंकल्पात भर दिला आहे. 

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पीक खर्चाच्या किमान दीडपट किमान हमी भाव देण्याची तरतूद सरकारने कायम ठेवली आहे. संरक्षण क्षेत्रासाठीच्या एकूण तरतुदीत सैन्यासाठी आवश्‍यक साहित्य आणि उपकरणाच्या खरेदीवर होणारा भांडवली खर्च वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. इंधन व गॅसदरवाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने इंधनावरील दर कमी करण्याची आवश्‍यकता आहे. कोरोनाच्या काळात महाविकास आघाडीने आरोग्य व इतर बाबींसाठी आवश्‍यक मदत न करता नागरिकांना वाऱ्यावर सोडले होते. या काळात केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी आर्थिक मदत केल्याने अनेक उपाययोजना करता आल्याचे श्री. उपाध्ये यांनी सांगितले.

शर्जील उस्मानवर कारवाई का नाही? 

पुण्यात शर्जील उस्मान या युवकाने हिंदू समाजाविषयी चुकीची भाषा वापरून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या शर्जीलवर कारवाई करण्यासाठी अद्याप शिवसेनेने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. या उलट महाविकास आघाडीच्या वतीने शिवजयंतीच्या कार्यक्रमाला विरोध केला जात असून हे दुर्दैवी असल्याचे श्री. उपाध्ये यांनी सांगितले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com