रामदास आठवलेंच्या 'Go Corona, Corona Go..'ला उदयनराजेंचे खास समर्थन; शरद पवारांच्या भेटीचेही उलगडले 'सत्य'

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : राज्यातील राजकारण सध्या कुठं चाललंय हे पाहून मलाच कळायचं बंद झाले आहे. मी कधी राजकारण केलेले नाही, समाजकारणच केले आहे. सध्या सुरू असलेले राजकारण हा करमणूकीचा भाग झाला आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये कोण काय करतंय तेच बघायचे, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे. 

खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी आज पत्रकारांनी संवाद साधला. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परिस्थितीवर उदयनराजेंनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, "कोरोनाची वस्तुस्थिती नजरेआड करून चालणार नाही. लोकांची अवस्था फारच बिकट झाली आहे. कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. कोरोनाबाबत एखादा निर्णय घ्यायचा झाला तर सर्व बाजूने विचार करणे बंधनकारक आहे. शासनातील तज्ञ लोकांनी याचा विचार केला नसेल असे मी म्हणत नाही. कॉमन कोल्ड प्रमाणेच कोरोना आहे. प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जे काय करायचे ते केले पाहिजे. 

कारण कोरोना लवकर जाणार नाही. कोणी काहीही म्हणू देत. गो कोरोना, गो कोरोना.. असे आमचे मित्र रामदास आठवले म्हणाले होते. त्यामागे त्यांची चांगली भावना आहे. पण, कोरोनाची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे. आपण सर्व निसर्गाच्या विरोधात जातोय, हे नजरेआड करून चालणार नाही. या झाडांमुळे आपण जीवंत आहोत. त्यांचीच मोठ्याप्रमाणात तोड होत आहे. कुठेही कचरा टाकला जात आहे. त्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहेत. शासनाने काय करायचे ते करू देत. पण, लोकांनीही विचार केलेला आहे. लोकहिताचा आरोग्याचा विषय महत्वाचा असला तरी खायला मिळाले नाही तर काय करणार. त्यामुळेच लॉकडाऊन शिथिल केले पाहिजे.'' 

खासदार शरद पवार यांची भेट घेतल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले,"" मी त्यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो. यामध्ये कोणतेही राजकारण नाही.'' राज्यात लसीचा तुटवडा असून, तीन दिवस पुरेल एवढा लसीचा साठा राज्यात आहे. याबाबत तुम्ही केंद्राकडून लसीची मदतीसाठी काय मदत कराल, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले,"" आपली लोकसंख्याच एवढी आहे की ग्रेट वॉल चायना तशी ग्रेट वॉट इंडिया बांधून टाका. आपल्याकडे इतक्‍या चांगल्या गोष्टी आहेत, त्या येथेच विकायला हव्यात. आपल्याला कुणाशी काहीही घेणे देणे नाही. कोरोनाने भितीदायक वातवरण निर्माण केले असून, त्यातून घाबरूनच अनेकजण जात आहेत.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com