
कऱ्हाड तालुक्यातील 104 ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर 29 जानेवारीला सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
कऱ्हाड (जि. सातारा) : तालुक्यातील 104 ग्रामपंचायतींची सरपंच निवड मंगळवार (ता. 23) आणि बुधवारी (ता. 24) होत आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यापासून इच्छुक असलेल्यांना पदभार स्वीकारण्याचे वेध लागले होते. मात्र, मध्यंतरी त्याला स्थगिती मिळाल्याने तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी पुन्हा निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
तालुक्यातील 104 ग्रामपंचायतींच्या निवडणुक निकालानंतर 29 जानेवारीला सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षण जाहीर झाल्यापासूनच गावोगावी सतास्थापनेची मोर्चेबांधणी झाली. मात्र, त्यानंतर त्यावर उच्च न्यायालयात आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी संबंधित निवडी 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगित ठेवल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा आदेश जाहीर केला. त्यानुसार तालुक्याचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार वाकडे यांनी तालुक्यातील सरपंच निवडी मंगळवारी आणि बुधवारी घेण्याचे आदेश जारी केले आहेत.
हे पण वाचा- थोडं फार होणारच! उदयनराजेंनी गृहराज्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोडले मौन
त्यानुसार मंगळवारी (ता. 23) हजारमाची, किरपे, विंग, कार्वे, मुंढे, ओंड, शेरे, मालखेड, घोणशी, घारेवाडी, खुबी, गायकवाडवाडी, शहापूर, म्हासोली, कालवडे, साकुर्डी, जखिणवाडी, भोळेवाडी, धोंडेवाडी, पोतले, साळशिरंबे, शेवाळवाडी (म्हासोली), सवादे, केसे, घोगाव, गोटेवाडी, कोणेगाव, शिवडे, वस्ती साकुर्डी, उंब्रज, इंदोली, मरळी, तासवडे, शिरवडे, शिरगाव, वहागाव, तांबवे, खराडे, पाल, साजुर, गोळेश्वर, वारूंजी, चिखली, वाठार, कोळे, सैदापूर, येरवळे, गोटे, नांदलापूर, काले, उंडाळे, पार्ले, निगडी, बनवडी, पेरले, विरवडे, करवडी, कोडोली, गोवारे, बेलवडे हवेली या गावाची सरपंच निवड होईल.
हे ही वाचा- जय शिवराय! सुर्वेंची तिसरी पिढी जपतेय मर्दानी खेळांची परंपरा
बुधवारी (ता. 24 ) : कामथी, येणके, शिंदेवाडी (विंग),जिंती, शेणोली, संजयनगर, वाघेश्वर, लटकेवाडी, गमेवाडी, बेलदरे, म्होप्रे, नांदगाव, म्हारुगडेवाडी, शेळकेवाडी (म्हासोली), शेवाळवाडी (उंडाळे), पाडळी-केसे, टाळगाव, भुरभुशी, रिसवड, भवानवाडी, अंबवडे, खालकरवाडी, हरपळवाडी, वडगाव उंब्रज, वराडे, वडोली निळेश्वर, चोरे, खोडशी, आबईचीवाडी, नवीन कवठे, खोडजाईवाडी, कोपर्डे हवेली, बेलवडे बुद्रुक, बामणवाडी, पाचुंद, चचेगाव, वसंतगड, भरेवाडी, चौगुलेमळा, आकाईचीवाडी, हणबरवाडी, भुयाचीवाडी, वाघेरी, सुर्ली या गावांची निवड होईल.
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
असा असेल निवडीचा कार्यक्रम
कऱ्हाड तालुक्यातील 104 ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सर्व ६१ अध्यासी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. सरपंच निवडी दिवशी सकाळी 10 ते 12 यावेळेत सरपंच पदासाठी अर्ज दाखल करता येतील. दुपारी दोन वाजता सभेस सुरवात होईल. त्यानंतर प्रथम दाखल अर्जांची छाननी, अर्ज माघार व त्यानंतर एकपेक्षाअधिक उमेदवारांचे अर्ज निवडणूक रिंगणात राहिल्यास मतदान, अशी प्रक्रिया होणार आहे, असेही श्री. वाकडे यांनी सांगितले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे