निवडणुकीची रणधुमाळी झाली थंड; आता 'सरपंच आरक्षणा'साठी होणार बंड?

Satara Latest Marathi News Satara Politics News
Satara Latest Marathi News Satara Politics News

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला असून कोणत्या गटाला किती जागा हे निश्चित झाले आहे. आता लक्ष सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागले आहे. आता सरपंच कोणाचा होणार याचे वेध सर्वांना लागले आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच संपली. कोणत्या गटाला किती जागा मिळाल्या, कोणत्या पक्षाने बाजी मारली याची आकडेवारी निश्चित झाली आहे. कोणत्या गावावर कोणाची सत्ता, कोणाचे वर्चस्व यावर शिक्कामोर्तबही झाले आहे, परंतु दर ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित केले जाते. 

मात्र, यावेळी निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतल्याने अनेक गावकारभाऱ्यांची गोची झाली आहे. निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केल्याने गावातील धनदांडगे पैशाची उधळण करत गावचे कारभारी होतात. मात्र, सर्वसामान्य माणूस आपल्या परिस्थितीमुळे मागेच राहतो व इच्छा असूनही गावाच्या सरपंचपदापासून वंचित राहतो. गावच्या निवडणुकीत काही ठिकाणी कोण किती खर्च करणार यावर त्याची उमेदवारी निश्चित केली जाते व सामान्य माणूस या प्रक्रियेतून दूर जातो. सामान्य माणसाला सुद्धा आरक्षणाच्या जोरावर सरपंच होता यावे यासाठी शासनाने ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या निवडणुकीत सरपंचपदासाठी रस्सीखेच झालेली पहायला मिळाली नाही. सर्वत्र शांततेत निवडणुका पार पडल्या.

ग्रामपंचायतीतील सदस्य निश्चित झाले. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याशिवाय गावचा कारभारी कोण होणार हे निश्चित होऊ शकत नसल्याने ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. आरक्षणानंतरही अनेक ग्रामपंचायतीत उलथापालथ होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांचा भाव वधारणार आहे. काही ठिकाणी काठावरचे बहुमत असल्याने प्रत्येक सदस्याच्या भूमिकेला महत्त्व आहे. त्यामुळे आता गावपुढाऱ्यांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे. यातही चुरशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com