esakal | प्रतिष्ठेच्या लढतीत कॉंग्रेसच्या पाटलांची राष्ट्रवादीच्या गायकवाडांवर मात; वाठार किरोलीत दहा वर्षांनंतर सत्तांतर
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara Politics News

भीमराव गायकवाड व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संभाजीराव गायकवाड यांनी वाठार ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

प्रतिष्ठेच्या लढतीत कॉंग्रेसच्या पाटलांची राष्ट्रवादीच्या गायकवाडांवर मात; वाठार किरोलीत दहा वर्षांनंतर सत्तांतर

sakal_logo
By
इम्रान शेख

रहिमतपूर (जि. सातारा) : वाठार (किरोली) येथे चुरशीच्या लढतीत जिल्हा परिषदेचे सदस्य भीमराव गायकवाड यांच्या कॉंग्रेस पुरस्कृत श्री अंबामाता ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने 13 पैकी दहा जागांवर विजय नोंदवून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दहा वर्षांच्या सत्तेचे सत्तांतर घडवून आणले. 

भीमराव गायकवाड व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संभाजीराव गायकवाड यांनी वाठार ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मागील दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान होते. कॉंग्रेसपुढे सत्ता परिवर्तनाचे आव्हान होते. या चुरशीच्या झालेल्या लढतीत कॉंग्रेस पुरस्कृत श्री आंबामाता ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने 13 पैकी दहा जागांवर विजय नोंदवून ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवून आणले. आंबामाता जनशक्ती पॅनेलचे तीन उमेदवार निवडून आले. दरम्यान, भीमराव गायकवाड यांना युवा नेते विवेक गायकवाड व भारतीय जनता पक्षाच्या गणेश घोरपडे यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. मिळालेल्या यशाचे श्रेय हे कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

Gram Panchayat Results : पवारवाडीत पवारांचा बालेकिल्ला ढासळला; 40 वर्षांनंतर सत्तांतर

विजयी उमेदवार : 

आंबामाता ग्रामविकास परिवर्तन पॅनेल : शिवानी बच्चाराम माळी (281), उषा सुरेश गायकवाड (275), सुनील दिनकर कांबळे (474), स्नेहल शामराव शिंदे (493), शंकर पांडुरंग गायकवाड (696), अनिता अनंत भिसे, (689), मनीषा केशव बुजले (690), रामदेव जयसिंग गायकवाड (374), मालन नारायण पवार (384), सुनंदा बजरंग गायकवाड (382). 

अंबामाता जनशक्ती पॅनेल : रेवत सिद्धवैद्यनाथ जंगम (360), धर्मेंद्र भानुदास गायकवाड (358), मंगल शंकर खामकर (348).

Gram Panchayat Results : राष्ट्रवादी-भाजप आघाडीने सेनेला केले चारीमुंड्या चित!  

संपादन : बाळकृष्ण मधाळे