

Satara Municipal Election
Sakal
-सिद्धार्थ लाटकर
सातारा: मनोमिलन या शब्दाभोवती फिरणाऱ्या सातारा पालिकेच्या निवडणुकीचा पहिला पडदा सोमवारी उघडला गेला. वैयक्तिक कारणास्तव आपलं कुणाशीही भांडण नसतं, असे मोठ्या भावानं स्पष्ट केले, तर छोट्या भावानं पक्षाची ताकद वाढविण्यासाठी एकदिलाने निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. दोन्ही भावांनी एकाच दिवशी एकाच प्रकाराचा निर्णय जाहीर केल्याने आता सातारकरांमध्ये नगराध्यक्षपदी कोण याकडे लक्ष लागून राहिले आहे.