
कऱ्हाड तालुक्यातील 87 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले.
कऱ्हाड (जि. सातारा) : तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी काल किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. 87 ग्रामपंचायतींसाठी चुरशीने 81 टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली.
सायंकाळी साडेपाचला मतदान संपल्यानंतर काही मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदार उपस्थित होते. त्यांचेही मतदान करून घेण्यात आले. मतदानादरम्यान पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. तालुक्यात 87 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 81 टक्के मतदान झाले. सैदापूर येथील वॉर्ड क्रमांक पाचमध्ये सर्वात कमी 51 टक्के, तर सर्वात जास्त शिंदेवाडी-विंगच्या तीन नंबर वॉर्डमध्ये 98 टक्के मतदान झाले. येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणीची प्रक्रिया सोमवारी (ता. 18) होणार आहे. त्यासाठीची कार्यवाही तहसील कार्यालयाकडून करण्यात आली आहे.
साताऱ्यात 654 ग्रामपंचायतींसाठी 75 टक्के मतदान; गावकारभाऱ्यांचे राजकीय भवितव्य मशिन बंद
पाटण : तालुक्यातील 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी काल चुरशीने मतदान झाले. काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. रात्री उशिरापर्यंत मतपेट्या जमा करण्याचे काम सुरू होते. सरासरी 75.56 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत थोरात यांनी दिली. 107 ग्रामपंचायतींपैकी 18 बिनविरोध, तर 17 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. 72 ग्रामपंचायतींमधील 391 जागेसाठी 775 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या बॅडमिंटन हॉल येथे मतमोजणी होणार आहे.
माणमध्ये 47 पंचायतींसाठी चुरशीने मतदान; 724 उमेदवारांचे भवितव्य यंत्रांत बंद
संपादन : बाळकृष्ण मधाळे