esakal | शेऱ्यात 'भीमाशंकर'ला 'माऊली'चे कडवे आव्हान; तिरंगी लढतीने चुरस वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara Politics News

शेरे ग्रामपंचायत निवडणुकीत पारंपरिक सत्ताधारी गटाविरोधात प्रतिस्पर्धी गट रिंगणात आहे. तरुणांच्या तिसऱ्या पॅनेलने रंगत आणली आहे.

शेऱ्यात 'भीमाशंकर'ला 'माऊली'चे कडवे आव्हान; तिरंगी लढतीने चुरस वाढली

sakal_logo
By
अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : पक्षविरहित गावातील निवडणुका नेत्यांच्या छत्राखाली न आणता स्थानिक कार्यकर्त्यांचे गट त्याची मांडणी करतात. त्याच धर्तीवर शेरे गावची सोसायटी व ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. शेरे ग्रामपंचायत निवडणुकीत पारंपरिक सत्ताधारी गटाविरोधात प्रतिस्पर्धी गट रिंगणात आहे. 

तरुणांच्या तिसऱ्या पॅनेलने रंगत आणली आहे. सत्ताधारी श्री भीमाशंकर ग्रामविकास पॅनेल विरोधात पारंपरिक गटाचे श्री भीमाशंकर ग्रामविकास परिवर्तन पॅनेल रिंगणात उतरले आहे. त्यांना तरुणांच्या माऊली ग्रामविकास पॅनेलने कडवे आव्हान दिले आहे. गावासह चव्हाण तळी, पवार आळी, विश्वास मळा, शेरेपाटी, थोरात मळा, शेरे स्टेशन, संजयनगर आदी भागात नागरिक वास्तव्यास आहेत. संजयनगर स्वतंत्र ग्रामपंचायतीमुळे निवडणूक स्थानिक कार्यकर्त्यांच्या गटात लढवली जाते. पारंपरिक दोन गटांसह तिरंगी लढत होत आहे. त्या गटांना गावातील तरुणांच्या व समाजसेवेच्या कार्यात अग्रेसर असलेल्या माऊली ग्रामविकास पॅनेलने कडवे आव्हान दिले आहे.

आधी बायकोला प्रेमानं शेवटचं Hug, मग दिलं लोकलमधून ढकलून 

15 जागांसाठी दोन अपक्षांसह 47 जण नशीब आजमावत आहेत. कऱ्हाड पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब निकम या गटप्रमुखासह स्थानिक पदाधिकाऱ्यांचे सत्ताधारी पॅनेल सत्ता अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर "कृष्णा'चे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे समर्थक अधिकराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री भीमाशंकर ग्रामविकास परिवर्तन पॅनेल रिंगणात आहे. गावातील तरुणांनी एकत्र येऊन माऊली ग्रामविकास पॅनेलने दोघांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात परिवर्तन व माऊली पॅनेल कशी व्यूहरचना आखतात. त्याचबरोबर हे चक्रव्यूह सत्ताधारी कसे भेदतात, हेदेखील पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

साताऱ्याचा नादच खुळा! धडधडत्या छातीवर हात ठेऊया, शत्रूला मात देऊया... प्रिया बेर्डेंचा ग्रामपंचायतसाठी धमाकेदार प्रचार  

सख्ख्या चुलत बंधूंच्या लढतीकडे लक्ष 
प्रभाग दोनमधून जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती भीमरावदादा पाटील यांचे नातू समीर पाटील हे सत्ताधारी पॅनेलकडून रिंगणात आहेत. भाजपचे नेते अतुल भोसले यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्याविरोधात त्यांचे सख्खे चुलत बंधू वैभव पाटील हे लढत देत आहेत. या दोघा चुलत बंधूंच्या लढतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे