esakal | कोरोनाग्रस्तांच्या मदतीला 'कदम' आले धावून

बोलून बातमी शोधा

Oxygen Cylinder
कोरोनाग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी कदम आले धावून
sakal_logo
By
फिराेज तांबाेळी

गोंदवले (जि. सातारा) : स्वतःचे वर्कशॉप बंद ठेऊन ऑक्‍सिजनचे भरलेले सिलिंडर देण्याच्या दातृत्वाने हे व्यावसायिक आता कोरोनाबधितांचे जीव वाचवण्यासाठी सरसावले आहेत. गोंदवल्यातील आत्माराम कदम यांनी ऑक्‍सिजनने भरलेले तब्बल 11 सिलिंडर आरोग्य विभागाला देऊन आदर्श ठेवला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सध्या सगळीकडे धुमाकूळ सुरू आहे. यावेळच्या विषाणूने मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे. शासकीय दवाखाने, कोरोना केअर सेंटरसह खासगी दवाखाने रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी बेडची वानवा झाली आहे. शिवाय गरजू रुग्णांना वेळेत रेमडिसिव्हिर व ऑक्‍सिजन वेळेत उपलब्ध होत नाहीत. ही भीषणता लक्षात घेऊन येथील आत्माराम कदम यांनी औदार्य दाखवले. गेल्या अनेक वर्षांपासून निवेदिता फॅब्रिकेशनच्या माध्यमातून ते येथे व्यवसाय करतात. सध्या लॉकडाउन असले तरी वर्कशॉपमध्ये त्यांना कामाची वानवा नाही. परंतु, कोरोनाबाधितांना ऑक्‍सिजनअभावी जीवाला मुकावे लागू नये, हाच विचार त्यांनी केला आहे.

मोहिते-पाटलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढ; युवतीने धुडकावली Offer

आपण वर्कशॉपमधील कामे थांबवली, तर गरजूंना ऑक्‍सिजन देता येईल आणि काहींचे जीव वाचतील म्हणून त्यांनी आपल्याकडील 11 ऑक्‍सिजन सिलिंडर देऊन खारीचा वाटा उचलला आहे. तालुक्‍यातील गरजूंना तातडीने ऑक्‍सिजन मिळावा म्हणून त्यांनी माणच्या आरोग्य विभागाकडे हे सिलिंडर सुपूर्त केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पवार, सामाजिक कार्यकर्ते तानाजी मगर, अनिकेत कदम यावेळी उपस्थित होते. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या प्रशासनाला मदतीचा हात देण्याचे मोलाचे काम आत्माराम कदम यांनी केले आहे, असे गौरवोद्‌गार डॉ. लक्ष्मण कोडलकर यांनी यावेळी काढले.

सध्या रुग्णांना ऑक्‍सिजनची आवश्‍यकता आहे. व्यवसायापेक्षा जीव वाचवणे महत्त्वाचे असल्यानेच मी वर्कशॉपची कामे थांबवून सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला.

- आत्माराम कदम, गोंदवले बुद्रुक

संकट काळातून बाहेर पडण्यासाठी कऱ्हाडातील 300 युवकांचे याेगदान