
सातारा : येथील राधिका रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असून, याठिकाणाहून जाताना नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासाकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवारी खड्ड्यात झाडे लावण्याचे आंदोलन करण्यात आले आहे.