Satara : प्रतापगडला आणखी दोन कबरी सापडल्या

त्या कबरी दुल्हे मिया, ख्वाजा मियाची असल्याचा दावा
प्रतापगड
प्रतापगडsakal

महाबळेश्वर : छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या व इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्यालगत असणाऱ्या अफजलखानाच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटविले. या ठिकाणी अफजलखानाच्या कबरीबरोबर सय्यद बंडा याची देखील कबर होती. मात्र, हे अनधिकृत बांधकाम पाडताना या दोन्ही कबरींपासून काही अंतरावरच आणखी दोन कबरी कर्मचाऱ्यांना आढळून आल्या आहेत. दरम्यान, या कबरी नेमक्या कोणाच्या याची माहिती जिल्हा प्रशासन घेत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रतापगडावरच्या स्थानिक नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी, की अफजलखानाच्या बरोबर एक सरदार आलेला होता. त्याचे नवीन लग्न झाले होते. तो प्रतापगडाच्या रणसंग्रामात मारला गेला, म्हणून त्याच्या कबरीला दुल्हे मियाची कबर, असे म्हटले जाते. ही कबर अफजलखान कबरीपासून २५ फूट लांब आहे, असे स्थानिकांनी सांगितले. दुसरी कबर अफजलखान याच्या कबरीच्या डाव्या बाजूला असलेली कबर ही अलीकडच्या काळातील ख्वाजा मिया याची आहे. ही कबर १८०० शतकातील असल्याचे बोलले जात आहे. ही कबर एका मुस्लिम बॅरिस्टरची आहे.

हे ख्वाजा १८०० शतकात बॅरिस्टर ख्वाजा मिया हे मुस्लिम धर्माचे असून, पीर फकीर दर्गा अशा गोष्टींना मानत नव्हते, तरी देखील ४० वर्ष अफजलखान कबरीची, दर्गाची पीर फकीर म्हणून सेवा करीत असे. तो अफजलखान कबरीच्या सेवेसाठी आला होता. त्याचा मृत्यू कबरीची सेवा करताना झाला होता. या कबरीचा मजार म्हणून उल्लेख केला जातो.अफजलखानाच्या कबरीशेजारी आणखी दोन कबरी असल्याच्या वृत्ताला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुजोरा दिला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत सध्या माहिती घेण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com