सातारा : शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करा; बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

सातारा : शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करा; बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांची मागणी

कऱ्हाड : गेल्या काही महिन्यांपासून सुपने, पश्चिम सुपने, केसे, पाडळीसह तांबवे विभागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पाळीव प्राणी मारण्याबरोबरच बिबट्या आता माणसावर हल्ला करू लागला आहे. त्यातच शेतीसाठी रात्रीची विज दिली आहे. बिबट्याच्या भितीने रात्री शेतकऱ्यांना शिवारात जाणे बंद केल आहे. त्याचा विचार करुन शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मागणी सुपनेतील शेतकऱ्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

शेतकरी शिवाजी पाटील, बाबासाहेब पाटील, शशिकांत कोळी, भागवत बडेकर, तुकाराम मोरे, राम गायकवाड, भिकाजी गायकवाड, दत्तात्रय थोरात, विश्वजित थोरात, भगवान गायकवाड, बाळासाहेब कोळी, दीपक गायकवाड, हणमंत जाधव,तुकाराम जांभळे तसेच शेतकऱ्यांनी निवेदन दिले. निवेदानच्या प्रती प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, महावितरणचे अधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनातील माहिती अशी ः बिबट्यामुळे सुपने-तांबवे विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: आणखी काही महिने दिवसाआडच पाणीपुरवठा होणार

त्यातच काही दिवसांपूर्वी येणके येथे बिबट्याने ऊसतोड मजुरांच्या लहान मुलावर हल्ला करून त्याला ठार केले आहे. त्यामुळे शेतकरी आता दिवसाही शेतात जायला घाबरत आहेत. महावितरणने शेती पंपासाठी रात्री साडेबारा ते सकाळी साडेआठ असा अन्यायकारक वीज पुरवठा सुरु ठेवला आहे. मात्र बिबट्याच्या भीतीने शेतकरी रात्री शेतात जात नाहीत. शेतातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील लोकांना तर दिवसा घराबाहेर पडणे धोक्याचे ठऱत आहे. त्यामुळे शेती पिकांसाठी दिवसा वीज पुरवठा करावा. अशी मागणी करण्यात आली आहे.

loading image
go to top