कऱ्हाड-मसूर मार्गावर रेल्वे फाटकातील दुरुस्तीने वाहनधारकांची गैरसोय

Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : कऱ्हाड-मसूर रस्त्यावरील रेल्वे फाटकातील दुरुस्तीचे काम आज सुरू होते. त्यामुळे दिवसभर रेल्वे फाटक बंद ठेवण्यात आले. त्यामुळे वाहनधारकांची कसरत झाली. काही वाहनधारकांना वाहतूक कोंडीमुळे मनस्तापही सहन करावा लागला. 

रेल्वे फाटक क्रमांक 96 येथील आतील रुळाची दुरुस्ती, खडीकरण, भरावा आदी कारणांसाठी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास रेल्वे गेट बंद करण्यात आले. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नजीकच्या ग्रामपंचायती, पोलिस ठाणे, कारखाने यांना कळवले होते. परंतु, सर्वांना माहिती नसल्याने अनेक वाहनचालकांची फसगत झाली. पर्यायी व्यवस्था म्हणून काही वाहनधारकांनी धुरुंगमळा ते उत्तर कोपर्डे मार्गाचा वापर केला. परंतु, अरुंद रस्ता, रेल्वे बोगदा व एकेरी वाहतूक असल्याने वाहतूक कोंडी होऊन वाहनधारकांना किरकोळ वादावादीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागले. वाहतुकीचा पल्ला वाढून वाहनांच्याही वर्दळीचा त्रास सोसावा लागला. वळणावर फलक नसल्याने वाहनधारकांची दिशाभूल झाली.

या ठिकाणी अनेकदा खडीकरण, रुळाचे काम, वेगवेगळ्या दुरुस्तीमुळे गेट बंद ठेवण्यात येते. त्यामुळे होणाऱ्या वाहनांच्या वर्दळीचा त्रास मात्र उत्तर कोपर्डे, नडशी कॉलनी व शिरवडे स्टेशन, कोपर्डे हवेली परिसरातील स्थानिकांना होतो. पर्यायी रस्ता म्हणून धुरुंगमळा ते नडशी रेल्वे पुलाच्या मार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची वाहने ने-आण करता येत नाहीत. जवळपास असलेल्या गावांना दैनंदिन कामामध्ये अडथळे निर्माण होतात. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com