रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदासाठी 'ही' नावे चर्चेत; 27 जूनला निवड

दिलीपकुमार चिंचकर
Monday, 8 June 2020

आशिया खंडात सर्वात मोठ्या असलेल्या या संस्थेच्या सचिव पदी कोणाची निवड होणार याकडे रयत प्रेमींसह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा : आशिया खंडात सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आगामी तीन वर्षासाठी निवड करण्या करीता 27 जून जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संस्थेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संस्थेच्या जनरल बॉडीची सभा होणार आहे. या सभेची माहिती संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी दिली.
 
रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड दर तीन वर्षानी केली जाते. या निवडी आजवर कर्मवीर पुण्यतिथी दिवशी म्हणजेच नऊ मे रोजी केल्या जात. यंदा कोरोना विषाणुच्या प्रसार रोखण्याकरीता संचारबंदी कडक होती. तसेच सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्याही झपाट्याने वाढत होती. जनरल बॉडीचे सभासद राज्याच्या विविध भागातून येणे शक्‍य नव्हते. त्यामुळे या निवडी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता 27 जून रोजी सुरक्षीत अंतराचे नियम पाळून जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेतली जाणार आहे. कार्याध्यक्ष डॅ. अनिल पाटील यांच्यासह सर्व जनरल बॉडीचे सदस्य उपस्थीत राहणार आहेत. या सभेत संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव पदासाठी निवड केली जाणार आहे. त्यानंतर दोन सहसचिवांचीही निवड केली जाणार आहे. रयत शिक्षण संस्थेचा विस्तार महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यात झालेला आहे.

कोण होणार सचिव ?
 
आशिया खंडात सर्वात मोठ्या असलेल्या या संस्थेच्या सचिव पदी कोणाची निवड होणार याकडे रयत प्रेमींसह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावर्षी सचिव पदांसाठी औंध (पुणे) येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डा. शिवलिंग मेनकुदळे, धनंजयराव गाडगिळ वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड, मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवणकर, दहिवडी येथील कॅलेजचे प्राचार्य बी. टी. जाधव यांची नावे सध्या जोरदार चर्चेत आहेत. यामधील कोणाची वर्णी सचिवपदासाठी लागणार याची चर्चा आत्तापासूनच सुरु झाली आहे. याबरोबरच सहसचिव कोणा होणार याकडेही लक्ष लागले आहे. 

शाळांत प्रवेश घ्या ऑनलाइन

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना साताऱ्यातून गेले पत्र

CoronaUpdate : खटाव, जावळीत काेराेना बाधितांची संख्या वाढली: खंडाळ्यातील एकाचा सारीने मृत्यु

काॅंग्रेस एकनिष्ठ आमदार भाजपच्या गोटात ?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Rayat Shikshan Sanstha General Body Meeting Will Held At 27 June