esakal | काॅंग्रेस एकनिष्ठ आमदार भाजपच्या गोटात ?
sakal

बोलून बातमी शोधा

काॅंग्रेस एकनिष्ठ आमदार भाजपच्या गोटात ?

कॉग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले. पक्ष आधी नंतर मी अशी आमची भुमिका राहील. मात्र पक्षातील काही लोकामुळे नेहमीच अवमानास्पद वागणूक मिळाली. त्याबाबत नेत्यांकडे तक्रार केली तरीही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आमदारकीची मुदत आज संपते आहे. पुढे काय करायचे, याचा निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून त्यांचा मेळावा घेवूनच घेणार आहे असे विधान परिषदेचे आमदार आनंदारव पाटील यांनी स्पष्ट केले.

काॅंग्रेस एकनिष्ठ आमदार भाजपच्या गोटात ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक म्हणून राज्यात ओळखले जाणारे आमदार आनंदराव (नाना) पाटील यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाल नुकताच संपला आहे. आमदार चव्हाण यांनी आनंदराव पाटील यांना विधान परिषदेवर संधी दिली. त्याची मुदत सहा जूनला संपली आहे. आनंदराव पाटील यांच्या आमदारकीची मुदत संपण्यापुर्वीच पृथ्वीराज चव्हाण व आनंदराव पाटील यांच्या गटात वितुष्ट आले. त्यामुळे नाना त्यांच्यापासून दुरावले आहेत. आमदारकीची मुदत संपलेल्या नानांची राजकारण आता वेगळ्या वळणावर आहे. नाना नक्की काय भुमिका घेणार याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. अनेक कार्यकर्त्याची वेगवेगळ्या इच्छा आहेत. त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून त्यांच्याशी चर्चा व त्यांना विश्वासात निर्णय घेणार आहे, असे आमदार पाटील यांनी 'सकाळ' शी बोलताना स्पष्ट केले.
कोरोनाच्या आणि अन्य बातम्या वाचा 

नाना चार दशकापेक्षाही जास्त काळा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत आहेत. विधानसभा 2019 च्या निवडणुकीत कॉग्रेस पक्षाच्या गटातंर्गत वादामुळे आंदराव पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून दुरावले. आमदारकीची मुदत संपपेपर्यंत ते भुमिका जाहीर करणार नव्हते. त्यांच्या आमादराकीची नुकतीच मुदत संपली आहे. त्यामळे नानांना भुमिका घ्यावी लागणार आहे. आमदार पाटील यांच्या विधानपरिषदेची मुदत संपल्याने लवकरच ते निर्णय घेतलीही मात्र आमदार नाना कोणती भुमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. बाबा आणि नाना यांचे राजकीय समीकरण जिल्ह्याला माहिती होते. त्यांच्या मैत्रीचाही अनुभव महाराष्ट्रानेही घेतला आहे. विधानसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची साथ सोडून भाजपाचे उमेदवार अतुल भोसले यांच्याशी नानांनी जवळीक वाढवली. त्यासाठी त्यांनी पुतणे आणि बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील व मानसिंग व प्रताप पाटील यांना निवडणुकीपुर्वीच भाजपचा गोटात पाठविले. त्यांच्या या कृतीतून त्यांनी पक्षालाही संकेत दिले. आजअखेर आनंदराव नाना यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला नाही. आता विधानपरिषदेची मुदत संपल्यानंतर ते कोणती भुमिका घेणार याकडे लाक्ष लागले आहे. 

आमदार आनंदराव पाटील यांचे पुर्नवसन कसे होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. नाना सन 1978 पासून (कै.) आनंदराव चव्हाण व प्रेमलाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षात काम करत होते. एक विश्वासू कार्यकर्ता म्हणून सातत्याने चव्हाण घराण्याने नानांच्याकडे पाहिले. नानांना युवक कॉंग्रेस पासून ते जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे ताब्यात दिली. मात्र अलीकडच्या काळात पक्षातंर्गत वादामुळे ते नाराज होते. कॉंग्रेस अतंर्गत मान-अपमानामुळे नाना हे पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून दुरावले आहेत. त्यांनी समर्थकांचा विजयनगरला मेळावा बोलवला. मेळाव्यामध्ये चव्हाण यांच्या गटात व्यवस्थित वागणूक मिळत नाही असे जाहीरपणे मत व्यक्त केले. आता पुन्हा एकदा ते कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावून कौल घेणार असल्याचे त्यांनी प्रथमच जाहीर केले आहे. त्यामुळे तालुक्‍यात पुन्हा एकदा चर्चा रंगत आहे. नाना विधानपरिषदेची मुदत संपल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार का, प्रवेश झाला तर त्यांचा भाजप कसे पुर्नवसन करणार, याची चर्चा सुरू आहे. 

चर्चाच चर्चा विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा : कॉंग्रेस नेत्याच्या कार्यकर्त्यास संधी मिळणार का ? 

'ताे" विषय काढला की कॉग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण काहीच बाेलत नाहीत

कॉग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले. पक्ष आधी नंतर मी अशी आमची भुमिका राहील. मात्र पक्षातील काही लोकामुळे नेहमीच अवमानास्पद वागणूक मिळाली. त्याबाबत नेत्यांकडे तक्रार केली तरीही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आमदारकीची मुदत आज संपते आहे. पुढे काय करायचे, याचा निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून त्यांचा मेळावा घेवूनच घेणार आहे असे विधान परिषदेचे आमदार आनंदारव पाटील यांनी स्पष्ट केले.

सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील ही गावे वगळू नका; काेणी केली सरकारला मागणी, पर्यावरणप्रेमींनी नक्की वाचा 

खासदार श्रीनिवास पाटलांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखांना धाडले पत्र

loading image