गुड न्यूज...लॉकडाउन काळात श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती

रविकांत बेलोशे 
Monday, 3 August 2020

कासवंड येथील ऋणानुबंध परिवाराच्या सदस्यांनी एकत्र येत सोनारकी ते गोळेवाडी हा रस्ता मुरूम आणून खड्डे तर बुजवलेच पण संपूर्ण रस्त्यावर मुरमाचा मुलामा देवून रस्ता दुरुस्त केला. यासाठी युवा कार्यकर्त्यांबरोबरच लहान लहान मुलांनीही यात श्रमदान केले. 

भिलार (जि. सातारा) : कासवंड (ता. महाबळेश्वर) येथील "ऋणानुबंध परिवारा'ने लॉकडाउन काळात गावाला जोडणारा सोनारकी ते गोळेवाडी हा रस्ता श्रमदानातून दुरुस्त केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

विनम्रता ही यशाची पहिली पायरी आहे, हे ब्रीदवाक्‍य सत्यात उतरवत कासवंड येथील ऋणानुबंध परिवाराच्या सदस्यांनी एकत्र येत सोनारकी ते गोळेवाडी हा रस्ता मुरूम आणून खड्डे तर बुजवलेच पण संपूर्ण रस्त्यावर मुरमाचा मुलामा देवून रस्ता दुरुस्त केला. यासाठी युवा कार्यकर्त्यांबरोबरच लहान लहान मुलांनीही यात श्रमदान केले. त्यामुळे गाव तसेच परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

या वेळी सर्जेराव पवार, विपुल जाधव, बिपीन पवार, गणेश पवार, श्रीकांत पवार, सचिन पवार, आदम शेख, वैभव पवार, अभिषेक पवार, प्रतीक उंबरकर, आकाश उंबरकर, सचिन ओंबळे, काशीनाथ बेलोशे (गुरुजी), डॉ. विजय उपाध्ये, विनायक पवार, सरपंच रवींद्र गोळे, सीताबाई पवार, शालन पवार, पूजा पवार, तानुबाई पवार आदींनी या श्रमदानात सहभाग घेतला. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

मसूर परिसरात 16 गावांत एक गणपती
 

आनंदाची बातमी...प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना आता चक्क डॉक्‍टर! - 

झिंगलेल्या झिंगाटांना कुणीतरी आवरा रे...महिंद धरणावर सेल्फीबहाद्दरांची वर्दळ - 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Road Repairs Done By Youth During Lockdown