

Seized vehicles parked inside the Satara RTO premises, creating space and administrative challenges.
Sakal
सातारा : प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात जप्त केलेली, दंड केलेली, चोरीची वाहने मोठ्या प्रमाणात पडून आहेत. आता या कार्यालयाचे आधुनिकीकरण सुरू असल्याने जागा कमी पडत आहे. त्यामुळे या परिसरात असलेली सुमारे १७० वाहने कोठे ठेवायची प्रश्न या कार्यालयापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी या वाहनांच्या मालकांना आपली वाहने दंड भरून घेऊन जावीत अन्यथा, या वाहनांचा लिलाव करण्यात येईल, अशा नोटिसा पाठवल्या आहेत.